Kolhapur Crime News | लॉकर शाबूत, कपाट बंद; तरीही ८ लाखांचे सोने गायब! लक्ष्मीपुरीतले 'ते' गूढ काय?
आंबेडकर गल्लीतील घरफोडीने खळबळ
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथीलआंबेडकर गल्लीमध्ये असलेल्या घरातून पाच तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे ८ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला. जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत ही चोरी झाली आहे. तिजोरीची चावी वापरुन ही चोरी केल्यामुळे माहितगारानेच ही चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मोहसीन शेख यांनी फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली.
फिर्यादी मोहसीन शेख हे राहत असलेल्या घराच्या तळमजल्यातील हॉलमध्ये लाकडी कपाटात दागिने ठेवले होते. जानेवारी महिन्यात शेख यांनी पाच तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ८० हजार रुपये त्यांनी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले. यानंतर ५ मे ला त्यांनी कपाटाचे लॉकर उघडले असता दागिने, रोकड मिळून आली नाही. कपाटाचे लॉकरही कोठे उचकटल्याचे दिसून येत नसल्याने ही चोरी माहितगारानेच केल्याचा संशय आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अधिक माहिती घेत आहेत.