For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परताव्यामध्ये पैसे की कूपन? : ओलाने पर्याय स्पष्ट करावा

06:03 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
परताव्यामध्ये पैसे की कूपन    ओलाने पर्याय स्पष्ट करावा
Advertisement

हे ठरविण्याची जबाबदारी ग्राहकांची : सरकारकडून ओला कॅबला पर्याय देण्यास सांगितले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी 2010 मध्ये एकत्रीत ‘ओला कॅब्स’ सुरू केले. कॅब सेवा देणारी कंपनी ओला कॅब्सला आता रिफंड प्रक्रियेत बँक खाते किंवा कूपन यापैकी एक पर्याय ग्राहकांना निवडण्याची संधी द्यावी लागणार आहे.

Advertisement

आता जेव्हा एखादा ग्राहक ओला अॅपवर परताव्यासाठी तक्रार करतो, तेव्हा कंपनी त्याला परतावा म्हणून एक कूपन देते, जे तो फक्त ओला अॅपवर पुढील राइडसाठी वापरू शकतो.

मात्र आता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) रविवारी 13 ऑक्टोबर कंपनीला हा आदेश जारी केला. रेग्युलेटरने सांगितले की, ‘ग्राहकाने थेट बँक खात्यात परतावा मागितला तरी ओला कॅबचे पैसे कूपनच्या स्वरूपात परत केले जातील.’

ऑर्डरमधील महत्त्वाचे मुद्दे...

? परताव्याचा पर्याय न देणे हे ग्राहक अधिकारांचे उल्लंघन असल्याचे ग्राहक मंत्रालयाने म्हटले आहे. असे करून कंपनी ग्राहकांना दुसरी राइड घेण्यास भाग पाडते.

? सीसीपीएच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी ओलाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून बुक केलेल्या सर्व ऑटो राइड्ससाठी ग्राहकांना बिल किंवा पावती इनव्हॉइस प्रदान करण्याचे निर्देश दिले.

नियामकाने म्हटले आहे की जर एखाद्या ग्राहकाला प्लॅटफॉर्मवर बुक केलेल्या ऑटो राइडसाठी चलन जारी करायचे असेल तर अॅप ‘ऑटो सेवा नियमांमधील बदल़’ सांगून तसे करण्यास नकार देतो.

ऑक्टोबरपर्यंत कंपनीविरोधात अधिकच्या तक्रारी

या वर्षी 9 ऑक्टोबरपर्यंत, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर ओला विरुद्ध 2,061 तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या, त्यापैकी बहुतांश तक्रारी ओव्हरबुकिंग भाडे आणि ग्राहकांना परतावा न दिल्याबद्दल होत्या.

सीसीपीएने कारणे दाखवा नोटीस

गेल्या आठवड्यात, सीसीपीएने ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला ग्राहक हक्कांचे उल्लंघन, दिशाभूल करणारी जाहिरात आणि अनुचित व्यापार प्रथेसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सूचिबद्ध कंपन्यांविरुद्ध एनसीएचकडे 10,000 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.