Kolhapur News : दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत 18 मंडळांवर गुन्हे दाखल
विसर्जन मिरवणुकीमध्ये १७ मंडळांचे साऊंड मिक्सरही पोलिसांनी केले जप्त
कोल्हापूर : दुर्गामाता मूर्ती बिसर्जन मिरवणुकीमध्ये आबाज मयदिचे उल्लंघन करुन, नियमबाह्य स्ट्रक्चर उभा करणाऱ्या १८ मंडळांबर रविवारी सायंकाळी गुन्हे दाखल करण्यात आले. १८ मंडळांच्या अध्यक्षांसह, डॉल्बीमालक, स्ट्रक्चर मालक अशा ५४ जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी विसर्जन मिरवणुकीमध्ये १७ मंडळांचे साऊंड मिक्सरही पोलिसांनी जप्त केले आहेत.
याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवसेन - सर्जेराव पाटील यांनी दिली. नवरात्रोत्सवानंतर दुर्गामाता मिरवणूक मूर्तीची विसर्जन शनिवार (४ ऑक्टोबर) रोजी मिरजकर तिकटी, खरी कॉ र्नर, बिनखांबी, पापाची तिकटी येथून इराणी खणीकडे निघाली. या मिरवणुकीमध्ये सुमारे १९ मंडळांनी साऊंडचा दणदणाट केला.
रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी साऊंड सिस्टीम बंद केल्या होत्या. रात्री १० नंतरही साऊंड सुरु ठेवणाऱ्या १७ मंडळांचे मिक्सर जप्त करुन त्यांच्यावर कारवाई केली होती. दरम्यान मिरवणुकीमध्ये साऊंड सिस्टीम वापरुन आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ९ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ९ मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस प्रशासनाने मिरवणुकीसाठी स्ट्रक्चरची लांबी रुंदी ठरवून दिली होती. याचे उल्लंघन या मंडळांनी केले आहे.
पोलिसांच्या सुचनांचे उल्लंघन
प्रसाद तरुण मंडळ अध्यक्ष सचिन रामचंद्र पवार, डॉल्बीमालक, स्ट्रक्चर मालक सत्यम सतीश पाटील, सत्यप्रकाश तरुण मंडळ अध्यक्ष अनुप अशोक सकटे, डॉ ल्बीमालक, स्ट्रक्चर मालक वेदांत तुकाराम जितकर, तटाकडील तालीम मंडळ अध्यक्ष सुशांत अरुण पाटील, डॉल्बीमालक पांडुरंग अनिल पोवार, स्ट्रक्चर मालक तेजस दत्तात्रय चौगले.
आवाज मयदिचे उल्लंघन करणारी मंडळे
श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ वारेवसाहत अध्यक्ष हर्षद प्रकाश आवळे, डॉल्बीमालक, स्ट्रक्चर मालक रमाकांत कांबळे, दत्त तरुण मंडळ अध्यक्ष सुजल प्रकाश जाधव, डॉल्बीमालक श्रीकांत गणपती पाटील, स्ट्रक्चर मालक पियुश सागर शिंदे, बेकहॅम ग्रुप रामकृष्ण गल्ली अध्यक्ष अश्विन अनिल बोगर डॉल्बी मालक कार्तिक, स्ट्रक्चर मालक विनोद चंद्रकांत कोईगडे, श्री महागणपती ग्रुप शहाजी वसाहत अध्यक्ष विकास सादु पाटील डॉल्बीमालक शुभम बाबासो पाटील, स्ट्रक्चर मालक अभिजित गणपती कोंडेकर
, श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ टिंबर मार्केट नगर अध्यक्ष सागर रामु पायरुट अध्यक्ष, डॉल्बीमालक चेतन गळवे, स्ट्रक्चर मालक साहील आंनदा पाटील, बालाजी पार्क मित्र मंडळ अध्यक्ष प्रसाद प्रकाश नलवडे, डॉल्बीमालक अभिजित बाळासो पाटील, स्ट्रक्चर मालक रवि धनसिंग राठोड, मस्कुती हायकर्स प्रणित जॉन संघटना अध्यक्ष सोमेश रविंद्र चौगले, डॉ ल्बीमालक पार्थ मनोज भोसले, स्ट्रक्चर मालक विजय भानुदास कांबळे, रंकोबा तालीम मंडळ अध्यक्ष आदित्य रविंद्र पोतदार, डॉ ल्बीमालक, स्ट्रक्चर मालक-गणेश शामराव कदम, गोल्डन बॉईज जवाहर नगर अध्यक्ष सुरज आनंदा आवळे, डॉल्बीमालक तरबेज शेख, स्ट्रक्चर मालक अक्षय मोरे, न्यु एकता तरुण मंडळ अध्यक्ष कैलास अरुण सकटे,
डॉल्बीमालक चिनु नाईक, स्ट्रक्चर मालक, तुरबत चौक मंगळवार पेठ अध्यक्ष प्रथमेश मुकुंद करपे, डॉल्बीमालक मयुर करपे, स्ट्रक्चर मालक-विशाल संजय चौगले, श्री मरगाई तरुण मंडळ अध्यक्ष गणेश विश्वास गजरे, डॉल्बीमालक संदेश अरुण पाटील, स्ट्रक्चर मालक-विघ्नहर्ता लाईट, पॉलिटीक्स ग्रुप अध्यक्ष यश बबन माळी, डॉल्बी मालक शैलेश शशिकांत पाटील, स्ट्रक्चर मालक, शिवप्रेमी मित्र मंडळ विचारेमाळ शाहूपुरी अध्यक्ष भोला संजय पवार, डॉल्बी मालक अभिजित दयानंद कांबळे, स्ट्रक्चर मालक शाहूपुरी किंग अध्यक्ष रोहीत सुभाष चव्हाण, डॉ ल्बीमालक आकाश देसाई, स्ट्रक्चर मालक-एस आर लाईट.
या सर्व मंडळांवर गुन्हे दाखल
दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीमध्ये सुमारे २० मंडळांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी ९ मंडळांनी आबाज मयदिचे उल्लंघन केले आहे, तर ९ मंडळांनी नियमबाह्य लाईट व साउंड स्ट्रक्चर उभा केले होते. या सर्व मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, लवकरच त्यांच्या विरोधात न्यायालयात खटले पाठविण्यात येणार आहेत.
- संजीव झाडे, पोलीस निरीक्षक, जुना राजवाडा