For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरुंधती रॉय विरोधात युएपीए अंतर्गत खटला

06:36 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरुंधती रॉय विरोधात  युएपीए अंतर्गत खटला
Advertisement

उपराज्यपाल सक्सेना यांनी दिली मंजुरी

Advertisement

►वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी कथित सामाजिक कार्यकर्त्या अणि लेखिका अरुंधती रॉय आणि अन्य एका विरोधात युएपीए अंतर्गत खटला चालविण्याची मंजुरी दिली आहे. 2010 मध्ये दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात प्रक्षोभक भाषणाप्रकरणी हा खटला चालणार आहे. युएपीए अंतर्गत खटल्याला सामोरे जावे लागणार असल्याचे रॉय अडचणीत आल्या आहेत.

Advertisement

रॉय यांच्यासोबत काश्मीर केंद्रीय विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसैन विरोधातही खटला चालविला जाणार आहे. अरुंधती रॉय आणि शौकत हुसैन यांनी 21 ऑक्टोबर 2010 रोजी दिल्लीत ‘आझादी-द-ओन्ली वे’च्या बॅनर अंतर्गत आयोजित एका संमेलनात प्रक्षोभक भाषण केले होते. याप्रकरणी 28 ऑक्टोबर 2010 रोजी सुशील पंडित यांच्याकडून दाखल तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.

Advertisement

.