For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime कुंपणानेच शेत खाल्लं! प्लॉट खरेदीच्या आमिषाने १८ लाखांची फसवणूक, पोलिस कॉन्स्टेबलच बनला आरोपी

09:10 PM Jun 13, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara crime कुंपणानेच शेत खाल्लं  प्लॉट खरेदीच्या आमिषाने १८ लाखांची फसवणूक  पोलिस कॉन्स्टेबलच बनला आरोपी
Advertisement

प्रतिनिधी सातारा
प्लॉट खरेदी करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत 18 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबल विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंगापूर-वंदन (ता. जि. सातारा) येथील पोलीस कॉन्स्टेबल सागर दिलीप भुजबळ (बक्कल क्रमांक 2677), नेमणूक पोलीस मुख्यालय सातारा, याने फिर्यादी मयूर हनुमंत कणसे (वय 32, रा. अंगापूर-वंदन, ता. जि. सातारा) यांना प्लॉट खरेदी करून त्यातून चांगला नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

फिर्यादीने विश्वास ठेवून आपल्या एसबीआय बँकेच्या गणेश चौक, कोडोली शाखेतील खात्यातून आरोपीच्या खात्यावर वेळोवेळी ऑनलाईन व्यवहाराद्वारे एकूण 18 लाख रुपये जमा केले. मात्र, संबंधित प्लॉटची खरेदी न करता तसेच घेतलेली रक्कम परत न देता आरोपीने फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

Advertisement

ही घटना 7 नोव्हेंबर 2024 ते 12 जून 2026 या कालावधीत अंगापूर-वंदन येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.