सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांवर लाचप्रकरणी गुन्हा दाखल
कोल्हापूर :
गुह्यात जप्त केलेला टेंम्पो सोडविण्यासाठी आणि गुह्यात मदत करण्यासाठी आणि न्यायालयात म्हणणे देण्यासाठी 50 हजार ऊपयांची मागणी केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव (मुळ रा. पेठकिनाई, ता. कोरेगांव, जि. सातारा, सध्या रा. अथ;व ओंकार कॉम्लेक्स, बापट कॅम्प, कोल्हापूर), पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगारे (मुळ रा. उमरगा चिवरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव, सध्या रा. विठूमाऊली अपार्टमेंट, निगडेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हूपर), कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे (रा. पुलाची शिरोली) अशी त्यांची नावे आहेत.
पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील म्हणाल्या, तक्रारदार आणि त्याच्या मित्राचा जनावरे वाहतुकीचा व्यवसाय करीत असून, त्याच्याविरोधी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुह्यात तक्रारदार याचा टेंम्पो जप्त केला आहे. तो जप्त टेंम्पो सोडविण्यासाठी आणि न्यायालयात म्हणणे देण्यासाठी गुह्याचे तपासी पोलीस अधिकारी गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगारे यांनी 30 हजार ऊपयांच्या लाचेची मागणी केली. तर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी तक्रारदारांना गुह्यात मदत करतो. याकरीता 35 हजार ऊपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील याची भेट घेवून तक्रार दाखल केली.
पडताळणीवेळी गुह्यातील जप्त टेंम्पो सोडविण्यासाठी आणि न्यायालयात म्हणणे देण्यासाठी गुह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगारे यांनी तक्रारदार यांना फोनवर पोलीस कॉन्स्टेबल संतोष कांबळे याची भेट घेण्यास सांगितली. त्याप्रमाणे कॉन्स्टेबल कांबळे याची भेट घेतली. त्यावेळी त्याने पोलीस उपनिरीक्षक शिरगारे याच्या सांगण्यावऊन तडजोडीअंती 15 हजार ऊपयांच्या लाचेची मागणी केली.
तर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांनी तक्रारदार अटकेत असताना गुह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार याच्या पार्टनरकडून यापूर्वी पैसे घेतल्याची कबुली देवून, पुन्हा गुह्यात मदत करतो. यासाठी उरलेल्या 35 हजार ऊपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार आणि त्याच्या पार्टनरकडे केली. त्याचबरोबर गुह्यातील टेंम्पो सोडण्याबाबत म्हणणे देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगारे यांना 10 हजार ऊपये द्यावे, अशी लाचेची मागणी केली.
या मागणीवऊन गांधीनगर पोलीस ठाण्यात गुऊवारी गांधीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगारे, कॉन्स्टेबल संतोष कांबळे या तिघाविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.
सपोनि जाधव याची आठ दिवसापूर्वी बदली
गांधीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव म्हणून काम करीत होते. त्यावेळी त्याच्या कामाच्या कार्यशैलीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यांच्याकडील पदभार तडकाफडकी काढून, त्यांची आठ दिवसापूर्वी पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. बदली झालेल्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याविषयी सक्त आदेश दिल्याने, ते पोलीस मुख्यालय कक्षात हजर झाले आहे.
पोलिस दलात चर्चा
सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगारे, कॉन्स्टेबल संतोष कांबळे या तिघांनी अनेकांच्या विरोधी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस डायरीत गुन्हे नोंद केले. त्याच पोलीस डायरीत त्याच्या विरोधी लाचेच्या पैश्याची मागणी केल्याबाबतचा दाखल गुह्याच्या काळाच्या उलट्याचक्राची जिह्याच्या पोलीस दलात चर्चा केली जात आहे.