For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Black Magic on Girl प्रेयसीला आपलेसे करण्यासाठी जादूटोणा, मांत्रिकावर गुन्हा दाखल, पोलीस पाटलाची सतर्कता

02:46 PM Jun 21, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
black magic on girl प्रेयसीला आपलेसे करण्यासाठी जादूटोणा  मांत्रिकावर गुन्हा दाखल   पोलीस पाटलाची सतर्कता
Advertisement

| प्रतिनिधी, कोल्हापूर

Advertisement

प्रेम प्रकरणातील यशासाठी मांत्रिकाकडून अघोरी कृत्य करून घेणारा अल्पवयीन हा प्रेयसी आपली व्हावी, तिने होकार द्यावा. यासाठी अघोरी पूजा व जादूटोणा करणाऱ्या एका मांत्रिक भोंदूवर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल केला. तेजस तानाजी कांबळे (वय २१ रा. शिरोली दुमाला, ता. करवीर) असे संशयीत भोंदूचे नाव असून तो करवीर तालुक्यातील गणेशवाडीत तलावाजवळ हा अघोरी प्रकार घडला. याबाबत पोलीस पाटील धनश्री मेढे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेशवाडी गावातील एका तरुणाचे गावातीलच एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र ती मुलगी त्याला काहीच दाद देत नसल्याने तो तरुण वैफल्यग्रस्त झाला होता. त्याने प्रेयसीला आपलेसे करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले, मात्र यश आले नाही. त्यामुळे मांत्रिक व जादूटोणा करणारा तेजसची भेट घेतली.

Advertisement

कांबळे याने त्याला आपल्यामध्ये दैवी शक्ती आहे, त्याचा वापर करून तुझे प्रेम मिळवून देतो असे सांगून १४ जून रोजी रात्री गणेशवाडी गावातील तलावाजवळ त्या तरुणास बोलवून अंगारा धुपारा, मंत्र तंत्र असे अघोरी कृत्य केली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून गणेशवाडी गावात घडलेल्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू होती. त्यानुसार गणेशवाडीच्या पोलीस पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार भोंदू मांत्रिक असलेल्या तेजस कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेड कॉन्स्टेबल मोरे तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.