Solapur : टेंभुर्णीत हेल्पर मृत्यूप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल
जिंदाल सॉ कंपनीतील हेल्पर मृत्यू प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
टेंभुर्णी : टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीत जिंदाल सॉ कंपनीत काम करीत असताना अंगावर तीनशे अंश तप्त मोल्डींग मेटेरील पडून भाजल्याने गंभीर जखमी होऊन मयत झालेल्या हेल्पर मृत्यू प्रकरणी अखेर चारजणांना जबाबदार धरून त्यांच्यावर टेंभुर्णी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ डिसेंबर रोजी पहाटे कंपनीत घडली होती.
टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीतील जिंदाल सॉ कंपनीतील हेल्पर राजेश रामहर्ष (वय-४७ वर्षे) रा.छिथी पोस्ट छियाही बाजार, जि. देवरीया उत्तर प्रदेश हल्ली (रा. टेंभुर्णी) हा २१ डिसेंबर रोजी पहाटे ३.३० वा. सुमारास काम करीत असताना ता औराई जि. शिवशंकर तीनशे अंश तप्त मोल्डींग मेटेरील अंगावर पडून भाजल्याने गंभीर जखमी होऊन सोलापूर येथे उपचार सुरू असताना मयत झाला होता.
याबाबत पोहेकों राजेश महादेव लांडगे (वय-३६ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. रविकांत सरोज (रा. नकटापुर भदोही-उत्तरप्रदेश) बानीपद मंडल. (रा.पो.जामजोडी, ता. ओढा, जि.बाकुरा-पश्चिमबंगाल), हरीमोहन हरेंद्र सिंग (रा.बारा पोस्ट बारा, ता. मोहंमदाबाद जि. मऊ, उद्रारप्रदेश, पंकज चंद्रप्रकाश अरोडा (रा.६१७ हरमिलापनगर, ता. बलटाणा, एस.ए.एस. नगर, जि. मोहाली पंजाब) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास एपीआय गणेश चौधरी हे करीत आहेत.