सेंट्रींगच्या प्लेटा चोरीचा गुन्हा उघड
सातारा :
सातारा शहरामधील विलासपूर येथून पहाटेच्या सुमारास एका बांधकामाच्या ठिकाणाहून चोरट्यांनी सेट्रींगच्या प्लेटा चोरी केलेल्या होत्या. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार डी. बी. पथकाने एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शिवतेज गणेश साळुंखे (वय 21, रा. कारंडवाडी ता. जि. सातारा) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने या चोरट्यांची माहिती प्राप्त करून त्याला ताब्यात घेतले. त्याने त्याच्या अन्य दोन साथीदारासमवेत या प्लेटा मोटर सायकलवरून वेळोवेळी चोरी करून चोरले असल्याचे सांगितले. त्याने या प्लेटा एका शेडमध्ये लपवून ठेवलेल्या असल्याबाबत सांगितले. या ठिकाणी गुन्ह्यातील चोरलेल्या 25 प्लेटा मिळून आल्या असून त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील जप्त करण्यात आलेली आहे. अन्य दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक, डॉ. वैशाली कडुकर, उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे, सहायक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम यांनी केलेली आहे.