For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मित्रावर गुन्हा

10:51 AM Jul 05, 2025 IST | Radhika Patil
तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मित्रावर गुन्हा
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

रत्नदुर्ग किल्ला सनसेट पॉईंटवरून तऊणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणात बँक कर्मचारी असलेल्या तिच्या मित्राविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 3 जून रोजी तऊणीचे वडील रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी मुलीच्या मित्राविऊद्ध गंभीर आरोप केल़े आपली मुलगी सुखप्रित व तिचा मित्र जसमिक केहर सिंग हे अनेक वर्षापासून प्रेमसंबंधात होत़े मात्र जसमिक याने अन्य मुलीशी जवळीक साधून आपल्या मुलीशी असणारे संबंध तोडल़े तसेच तिचा मानसिक छळ केला, अशी तक्रार तिच्या वडिलांनी शहर पोलिसांत दिल़ी त्यानुसार पोलिसांकडून जसमिक याच्याविऊद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 27 जून रोजी वडिलांशी शेवटचे बोलणे

तऊणीचे वडील प्रकाशसिंह हरनेकसिंग धालिवाल (69, ऱा हरियाणा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटेल आहे की, मुलगी सुखप्रित ही नाशिक येथील आयडीबीआय बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत होती. याठिकाणीच ती भाड्याने खोली घेऊन वास्तव्य करत होती. 27 जून रोजी मुलगी सुखप्रित हिने मला फोन केला होता. यावेळी मी तिला काही पैसे पाठवण्यास सांगितले. हे माझे तिच्याशी झालेले शेवटचे बोलणे ठरल़े यानंतर तिने दहा हजार ऊपये ऑनलाईन पाठवले होत़े

Advertisement

  • 28 रोजी दिवसभर फोन बंद असल्याने चिंता वाढली

28 जून रोजी वडिलांनी तिला पैसे आल्याचे सांगण्यासाठी फोन केल़ा मात्र तिचा फोन बंद लागत होत़ा त्यानंतर दिवसभरात त्यांनी तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा फोन बंदच येत होता. म्हणून वडिलांनी नाशिक पिंपळगाव येथे राहणाऱ्या नातेवाईकांना सुखप्रित हिच्याबाबत माहिती घेण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे 29 जून रोजी मनज्योत नावाचा नातेवाईक सुखप्रित राहत असलेल्या ठिकाणी गेला. मात्र तिच्या रुमला लॉक होते. त्याने घरमालकाकडे चौकशी केली असता शनिवार, रविवार सुट्टी असल्याने सुखप्रित फिरायला बाहेर गेलेली आहे. सोमवारी परत येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आल़े त्यानंतर त्यांनी सोमवारपर्यंत वाट पाहण्याचे ठरविल़े

  • आत्महत्येबाबत चिठ्ठी सापडल्याने पायाखालची वाळू सरकली

सुखप्रित ही 30 जूनला सकाळी बँकेत गैरहजर असल्याची माहिती नातेवाईक मनज्योत याला समजल़ी यावेळी काही तरी अघटीत घडले असल्याबाबत शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकल़ी मनज्योत याने घरमालकाकडून चावी घेऊन सुखप्रित तिच्या खोलीचे लॉक उघडल़े यावेळी खोलीच्या बेडवर उशीच्या खाली एक चिठ्ठी आढळून आल़ी त्यामध्ये तिने आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. हे वाचताच मनज्योत याच्या पायाखालची वाळू सरकल़ी.

  • पिंपळगांव पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल

सुखप्रितच्या शेजारी राहणारे रवी बिस्मावर सैनी यांनी नाशिक येथील पिंपळगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तिचे वडील व भाऊ हे इतर नातेवाईक यांच्यासह हरियाणा येथून निघून पिंपळगावला 1 जुलैला पोहोचल़े त्याठिकाणी त्यांनी सुखप्रित हिच्याबाबत माहिती घेतली. पोलिसांकडून सुखप्रित हिचे शेवटचे लोकेशन रत्नागिरी येथे असल्याचे समजले.

  • जसमिक याने रत्नागिरीत नसल्याचे सांगून भेट टाळली

सुखप्रित हिच्या मैत्रिणीकडून तिच्या वडिलांना तिचा रत्नागिरी येथे राहणारा मित्र जसमिक सिंग याच्याबाबत माहिती मिळाली. म्हणून त्यांनी जसमिक सिंग याच्या नंबरवर फोन करून मुलगी सुखप्रित हिच्याबाबत माहिती घेतली. त्याने 29 जून रोजी सकाळी सुखप्रित हिने अनोळखी नंबरवरून फोन केला होता, असे सांगितले. ती रत्नागिरी येथे आलेली होत़ी मात्र त्याने बाहेर आहे, असे सांगून परत नाशिक येथे जाण्यास सांगितल़े. असे जसमिक सिंग याने तऊणीच्या वडिलांना सांगितले.

  • जसमिकने सुखप्रितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

जसमिक सिंग याने आपल्या मुलीला फसविल़े त्याने सुखप्रित हिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. त्यानंतर तिच्याशी असलेले नाते तोडून दुसऱ्या मुलीसोबत सूत जुळवून सुखप्रित हिला टाळून मानसिक छळ केला. 29 जूनला रत्नागिरी येथे त्याला भेटण्यासाठी आली असताना तिला न भेटता परत नाशिक येथे जाण्यास सांगितल़े तसेच तिला मानसिक त्रास देऊन रत्नदुर्ग किल्ला येथून उडी मारून जीव देण्यासाठी प्रवृत्त केले, अशी तक्रार सुखप्रित हिचे वडील प्रकाशसिंह धालिवाल यांनी दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी जसमिक याच्याविऊद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आह़े दरम्यान सलग सहाव्या दिवशी रत्नदुर्ग किल्ला परिसर व समुद्रात प्रशासकीय यंत्रणेकडून सुखप्रितचा शोध सुरू होता. मात्र ती सापडून आली नाही.

Advertisement
Tags :

.