For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन मंडळातील मारामारी प्रकरणी 13 जणांवर गुन्हा

01:29 PM Sep 09, 2025 IST | Radhika Patil
दोन मंडळातील मारामारी प्रकरणी 13 जणांवर गुन्हा
Advertisement

कराड :

Advertisement

येथील रविवार पेठेतील छत्रपती गणेश मंडळ व देवांग गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादानंतर काल हा वाद मिटवत असताना झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही मंडळातील 13 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

छत्रपती व देवांग मंडळाची मिरवणूक सुरू असताना क्रांतीकुमार मोरे याचा युवराज मर्ढे याला धक्का लागला आणि त्यानंतर वाद झाला. काल हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही मंडळातील पदाधिकारी एकत्र आले होते. मात्र त्यादरम्यान एकाने वीट फेकून मारली. त्यावरुन झालेल्या वादानंतर दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना मारहाण केली होती. यात तीन जण जखमी झाले होते. याबाबत छत्रपती गणेश व नवरात्र उत्सव मंडळातील क्रांतीकुमार दिनकरराव मोरे (रा. दिवटे गल्ली, क्रहाड) याने दिलेल्या तक्रारीवरून देवांग गणेश मंडळातील युवराज पांडुरंग मर्ढे, सुभाष प्रल्हाद वेदपाठक, रमेश प्रल्हाद महादर, अमोल जगन्नाथ मर्ढे, संजय शामराव जाधव (सर्व रा. कोष्टी गल्ली, रविवार पेठ, कराड) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

देवांग गणेश मंडळाचे युवराज मर्ढे याने दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीकुमार मोरे, आप्पासाहेब बबन खोत, अमित मुकुंद नलावडे, संकेत हनुमंत पवार, विनोद हनुमंत भिंताडे (सर्व रा. दिवटे गल्ली, रविवार पेठ, कराड) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.