For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किराणा दुकानदाराला धमकावणाऱ्या पत्रकार संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा

12:25 PM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
किराणा दुकानदाराला धमकावणाऱ्या पत्रकार संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा
Advertisement

बेळगाव : जाबापूर-हुक्केरी येथील किराणा दुकानदाराला धमकावल्याच्या आरोपावरून कर्नाटक श्रमिक पत्रकारांचा आवाज या संघटनेच्या अध्यक्षावर हुक्केरी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. डॉ. रवी बाबू कांबळे याच्यावर त्याच गावातील लक्ष्मण साताप्पा भंडारी (वय 74) या वृद्धाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता 329(4), 126(2), 115(2), 352, 351 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हुक्केरी पोलीस पुढील तपास करीत आहेत. दि. 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण भंडारी यांच्या किराणा व पानपट्टी दुकानात बेकायदा प्रवेश करून लक्ष्मण या वृद्धाला मारहाण करून धमकावल्याचा आरोप ठेवून एफआयआर दाखल केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.