For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन यांच्यावर गुन्हा

06:41 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन यांच्यावर गुन्हा
Advertisement

वृत्तसंस्था / अमरावती

Advertisement

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रे•ाr, तत्कालीन सीआयडी प्रमुख पीव्ही सुनील कुमार आणि गुप्तचर विभाग प्रमुख पीएसआर अंजनेयुलु यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुंटूर पोलिसांनी आमदार रघुराम कृष्णम राजू यांच्याकडून नोंदविण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर हे पाऊल उचलले आहे. सीआयडी कार्यालयात आपल्याला बेल्ट आणि काठीने मारहाण झाल्याचा आरोप राजू यांनी केला होता.

2021 मध्ये हैदराबादमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांनी मला अटक केली होती. यानंतर हैदराबादमध्ये स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मला हजर करण्यात आले नाही तसच ट्रान्झिट अरेस्ट वॉरंटही प्राप्त करण्यात आले नाही. तरीही सीआयडी कार्यालयात मला हलविण्यात आले. तेथे जबर मारहाण करण्यात आली होती अशी तक्रार राजू यांनी केली आहे.

Advertisement

सीआयडी कार्यालयात पीव्ही सुनील कुमार यांच्यासोबत अनेक पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी काठीने मारहाण केली आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जगनमोहन रे•ाr यांच्या दबावामुळे मला हृदयविकाराच्या औषधांचे सेवन करण्यापासून अधिकाऱ्यांनी रोखले होते.  माझी बायपास शस्त्रक्रिया झाली असल्याचे माहित असतानाही काही अधिकारी मला खाली पाडवून माझ्या छातीवर बसले होते. माझा फोन हिसकावून घेत त्याचा पासवर्ड सांगत नाही तोवर मला मारहाण करण्यात आली. शासकीय रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रभावती यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र जारी केल्याचा आरोप राजू यांनी केला आहे.

जगनमोहन रे•ाr यांच्यावर टीका केली तर ठार करू अशी धमकी पीव्ही सुनील कुमार यांनी दिल्याचा दावा रघुराम कृष्णम राजू यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.