For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘महादेव’ सट्टा प्रकरणात बघेल यांच्याविरुद्ध गुन्हा! हवालाद्वारे पैसे मिळाल्याचा ठपका

06:49 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘महादेव’ सट्टा प्रकरणात बघेल यांच्याविरुद्ध गुन्हा  हवालाद्वारे पैसे मिळाल्याचा ठपका
Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी वाढू शकतात. रायपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने महादेव अॅप बेटिंग प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह इतरांविऊद्ध एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात सहभागींविरोधात भादंविच्या कलम 120बी, 34, 406, 420, 467, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूपेश बघेल यांच्यासह इतर 21 जणांचा या प्रकरणात समावेश आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून काँग्रेसने लोकसभेचे तिकीट दिले आहे. आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच बघेल यांच्याविरोधात तपासाने वेग घेतल्याचे दिसत आहे.

महादेव बेटिंग अॅपच्या मालकांकडून 508 कोटी ऊपयांची सुरक्षा ठेव घेतल्याबद्दल ईओडब्ल्यू आणि एसीबी शाखेने माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि इतर 21 जणांविऊद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यांनी हा एफआयआर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये नोंदवला आहे. या प्रकरणातील गुन्ह्याची अंदाजे रक्कम सुमारे 6,000 कोटी ऊपये आहे. ईडी या प्रकरणाची चौकशी करत असून राज्य आर्थिक गुन्हे शाखा/लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोला सादर केलेल्या अहवालाच्या आधारे कारवाई सुरू असल्याचे ईओडब्ल्यूच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भूपेश बघेल आणि त्यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यांना महादेव सट्टा अॅपने कोट्यावधी ऊपये दिल्याचा दावा ईडीने आपल्या आरोपपत्रात केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.