For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाजरातली क्रांती

06:15 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
गाजरातली क्रांती
Advertisement

‘गाजर’ हा आपल्या नेहमीच्या खाण्यातील पदार्थ आहे. गाजराची कोशिंबीर किंवा भाजी केली जाते किंवा ते नुसतेही कच्चे खाल्ले जाते. त्यात ‘बीटा कॅरोटिन’ नामक द्रव्य असते, जे आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असते. विशेषत: डोळे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी ते अत्यंत आवश्यक असते. गाजर हे केशरी रंगाचे किंवा तांबडट केशरी रंगाचे असते. तथापि, संशोधनातून असे दिसून आले आहे, की गाजराचा रंग सहस्रावधी वर्षांपूर्वी निळसर किंवा वांग्याच्या रंगाप्रमाणे होते. पुढे माणसाने गाजरामध्ये क्रांती घडवून आणली आणि त्याला आजचा रंग प्राप्त झाला.

Advertisement

असे दिसून आले आहे, की प्रारंभीच्या काळातील गाजरे अत्यंत पातळ असायाची आणि ती आजच्या इतकी चवदार किंवा गोडही नव्हती. ती अत्यंत बेचव होती. गाजर हा मानवाने खाण्याचा पदार्थ आहे, हो शोध साधारणत: 6 हजार वर्षांपूर्वी लागला. पाच हजार वर्षांपासून त्यांच्या शेतीला प्रारंभ झाला. सहस्रावधी वर्षांच्या कालखंडात गाजराचा प्रवास युरोप आणि मध्यपूर्वेपर्यंत झाला, साधारणत: 1,500 वर्षांपूर्वी नेदरलँडस्मध्ये गाजराच्या शेतीचा प्रारंभ झाला आणि त्या भागातील लोकांनी गाजरावर जे प्रयोग केले, त्यांच्यामुळ 1,600 वर्षांपासून गाजराच्या रंगात परिवर्तन होऊ लागले. निळसर किंवा वांग्याच्या रंगाची असणारी गाजरे आता फिक्कट तांबडी किंवा केशरी रंगाची दिसू लागली. निसर्गात सापडणाऱ्या गाजरांच्या विविध प्रजातींची कलमे करुन सध्याचे आधुनिक गाजरांचे वाण बनविण्यात आले आहे. कलम केल्याने नव्या गाजरांमध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण वाढले. तसेच त्यांची चव अधिक गोड झाली. आता जगभर तांबड्या-केशरी रंगाचीच गाजरे उपलब्ध आहेत. मूळजी निळसर रंगाची गाजरे आता पहावयासही मिळत नाहीत. अशा प्रकारे मानवाने गाजरात अशी उत्क्रांती घडविली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.