ह्युंडाई मोटर इंडियातर्फे कार्निव्हलचे आयोजन
महाराष्ट्रातील नाशिक येथे 5 एप्रिल 2025 रोजी आयोजन
वृत्तसंस्था/नाशिक
ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)ने विशेष ग्राहक संबंध महोत्सव ‘ह्युंडाई एक्सप्लोरर्स कार्निव्हल’च्या पुढील एडिशनची घोषणा केली. जो 5 एप्रिल 2025 (शनिवार) रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्निव्हलमध्ये जेथे भारतभरातील ह्युंडाई मालकांच्या विकसित होत असलेल्या समुदायामधील हजारो ग्राहक एकत्र आले आहेत. ह्युंडाई एक्स्प्लोरर्स कार्निव्हलमधून ग्राहक-केंद्रित्वाप्रती, तसेच शोध व साहसाचा उत्साह सामावलेला संस्मरणीय अनुभव देण्याप्रती एचएमआयएलची कटिबद्धता दिसून येते. ह्युंडाई ग्राहक प्ब्ल्र्ह्गेज्त्दे.म्दस् येथे भेट देत नाममात्र नोंदणी शुल्कामध्ये त्यांची स्वत:ची व पुटंबातील जवळपास 3 सदस्यांची नोंदणी करु शकतात.
एचएमआयएलचे पूर्णवेळ संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग म्हणाले “ह्युंडाईमध्ये आमची उत्पादने व सेवांच्या माध्यमातून किंवा ह्युंडाई एक्सप्लोरर्स कार्निव्हल या सारख्या अद्वितीय उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांसाठी उत्साहवर्धक अनुभव निर्माण करण्यावर विश्वास आहे. भारतभरात 11 यशस्वी एडिशन्स पूर्ण करण्यासह आता दुसऱ्या वर्षामध्ये ह्युंडाई एक्सप्लोरर्स कार्निव्हल ह्युंडाई मालकांच्या निष्ठावान समुदायाला एकत्र आणत आहे. आगामी एडिशन ग्राहकांना नाशिकच्या नयनरम्य व ऐतिहासिक आकर्षणांच्या माध्यमातून प्रायोगिक प्रवासावर घेऊन जाण्याची खात्री देते, जेथे स्थानिक स्वाद, रोमांचक गेम्स व मंत्रमुग्ध लाईव्ह म्युझीकने भरलेल्या उत्साहवर्धक कार्निवल महोत्सवासह या प्रवासाची सांगता होईल.