For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनगटाच्या दुखापतीमुळे कार्लोस अल्कारेझ सिनसिनाटी ओपनमधून बाहेर

07:49 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनगटाच्या दुखापतीमुळे कार्लोस अल्कारेझ सिनसिनाटी ओपनमधून बाहेर
Advertisement

वृत्तसंस्था, सिनसिनाटी

Advertisement

मंगळवारी स्पर्धेच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार गतविजेता कार्लोस अल्कारेझ मनगटाच्या दुखापतीमुळे या महिन्यात होणाऱ्या सिनसिनाटी ओपनमधून बाहेर पडला आहे. एप्रिलमध्ये बर्सिलोना ओमनमधून माघार घेतल्यापासून स्पर्धेपासून दूर असलेला हा 23 वर्षीय स्पॅनिश खेळाडू एटीपी मास्टर्स 1000 स्पध्घ्xत पुनरागमन करण्याच्या तयारीत होता.

दुखापतीतून सावरत असताना अल्कारेझ त्याचे फ्रेंच ओपनचे विजेतेपद राखता आले नाही आणि तो विम्बल्डनलाही मुकला. स्पर्धेचे संचालक बॉब मोरन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कार्लोस लवकरात लवकर स्पर्धांमध्ये परतण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. हे आम्हाला माहित आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अल्कारेझने गेल्या वर्षी सिनसिनाटीचे विजेतेपद जिंकले होते. त्यावेळी अंतिम सामन्यातून जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या यानिक सिनरने माघार घेतली होती. सिनसिनाटी ओपन 13 ते 23 ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाईल.

Advertisement

Advertisement

.