For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंजणारी घाटात मालवाहू ट्रकला अपघातानंतर आग

06:23 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
आंजणारी घाटात मालवाहू ट्रकला अपघातानंतर आग
Advertisement

चालकासह क्लीनर जखमी

Advertisement

त. भा. वार्ताहर

पाली :

Advertisement

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सायंकाळी 3.45 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचालकाचा आंजणारी घाटातील तीव्र उतारावर वाहनावरील ताबा सुटल्याने प्रथम त्याने पुढे जाणाऱ्या एका ट्रकला मागून धडक दिली. नंतर ट्रक रस्त्याच्या विऊद्ध बाजूच्या मार्गिकेवर जाऊन रस्त्यावर  उलटल्याने ट्रकच्या डिझेल टाकीने अचानक पेट घेतला. यावेळी ट्रकला आग लागून ट्रकमधील चालक व क्लीनर वाहनांमध्येच अडकून पडून गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी लांजा ग्रामीण ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताबाबत घटनास्थळावरून महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र हातखंबाच्या कर्मचाऱ्यांनी व लांजा पोलीस ठाणे येथून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी 3.45च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटामध्ये मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रक  (आरजे 27 जीडी 9798) हा घेऊन चालक उदय साळवी (30 रा. उदयपूर, राजस्थान) मुंबईहून गोव्याच्या दिशेने माल घेऊन जात असताना आंजणारी घाटात आला असता त्याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे त्याने प्रथम पुढे जाणाऱ्या ट्रक (केएल 29जे 9721) ला मागून जोराची धडक दिली. यावेळी ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने विऊद्ध बाजूच्या मार्गीकेवर जाऊन उलटल्याने डिझेल टाकीने पेट घेतल्याने आग लागून पूर्ण ट्रक आगीच्या भक्षस्थानी पडला.

यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळपणे मोठ्या धैर्याने पुढे येऊन अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकलेल्या चालक दीपक साळवी व हर्षसिंह  खेमलालजी रजपूत  (23) दोघेही रा. उदयपूर,राजस्थान यांना मोठ्या कसोशीने बाहेर काढून  उपचारासाठी दाखल केले. अपघातात पेटलेल्या ट्रकमुळे महामार्गावरील एका मार्गिके वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अपघातग्रस्त ट्रकची आग ही रत्नागिरी एमआयडीसीच्या अग्निशामक बंबाच्या मदतीने  नियंत्रणात आणण्यात आली.

अपघातानंतर घटनास्थळी तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम,लांजा पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे, महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र हातखंबाचे पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कोळी पाटील श्री. संकपाळ,  चालक नटे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

Advertisement
Tags :

.