अमेरिकेत हवेतच मालवाहू विमानात आग
पक्ष्याच्या धडकेनंतर घटना : सुदैवाने मोठी हानी टळली
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत एका कार्गो (मालवाहू) विमानाला हवेतच आग लागल्याची घटना निदर्शनास आली आहे. एका पक्ष्याने फेडेक्स कार्गो विमानाच्या इंजिनला धडक दिल्यामुळे ही आग लागली. यानंतर विमानाला न्यू जर्सीतील नेवार्क विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये उ•ाणादरम्यान विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसून येत आहे. काही मिनिटांमध्ये ही आग विझल्यामुळे मोठे नुकसान टळले आहे. विमानाच्या इंजिनला आग लागली असली तरी ते सुरक्षितपणे उतरवण्यात पायलटला यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती, परंतु नंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.