For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कळंगुट येथे ‘केअर टेकर’चा खून

01:21 PM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कळंगुट येथे ‘केअर टेकर’चा खून
Advertisement

म्हापसा : पोरबावाडा-कळंगुट येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला खून झाल्याची घटना घडली. मूळ पश्चिम बंगाल येथील एस. देवदास असे या मृत केअरटेकरचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा केअरटेकर पाहत असलेल्या मालमत्तेचे मूळ मालक मुंबईत वास्तव्यास आहेत. मृत देवदास हा गेल्या 15 वर्षापासून केअरटेकर म्हणून काम करत होता. मालकाने त्याच मालमत्तेत देवदासला राहण्यासाठी एका स्वतंत्र खोलीची सोय केली होती. त्यात दोघेजण राहत होते. 31 डिसेंबर रोजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दोघेजण मद्यपान करत होते. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला. यावेळी संशयिताने देवदास याच्यावर जड वस्तूने प्रहार केला. त्यात देवदास याचा मृत्यू झाला. सीसीटीव्हीची पडताळणी करण्यात आली असता त्या परिसरात कोणीच आले नसल्याचे आढळून आले. यानंतर त्याची माहिती कळंगुट पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी संशयिताला अटक करून तपास सुरू केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.