चौथ्यांदा आई झाली कार्डी बी
जगप्रसिद्ध अमेरिकन रॅपर कार्डी बी चौथ्यांदा आई झाली आहे. तिने स्वत:चा जोडीदार आणि एनएफएल स्टार स्टीफन डिग्गसोबत नवजाताचे स्वागत केले आहे. कार्डी बीने इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत स्वत:च्या चौथ्या अपत्याच्या जन्माची पुष्टी दिली आहे. माझ्या जीवनात अनेक उतार चढाव राहिले आहेत, माझा मागील चॅप्टर एका नव्या ऋतूची सुरुवात होता. नव्याने सुरुवात करणे कधीच सोपे नसते, मी जगासाठी नवे म्युझिक आणि एक नवा अल्बम घेऊन आले आहे. माझ्या जगात एक नवे मूल आले असून स्वत:चे अधिक चांगले वर्जन होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे 33 वर्षीय गायिकेने म्हटले आहे.
मी आता स्वत:वर प्रेम करू लागली आहे. माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मी सामना करत आहे. स्वत:चे शरीर आणि मेंदू नीट ठेवण्यासाठी मी टूरची तयारी सुरू केली आहे. कुठलीच गोष्ट मला आयुष्यातील सर्वात स्मरणीय कामगिरी करण्यापासून रोखू शकत नाही, असे तिने म्हटले आहे. कार्डी बीला पूर्वाश्रमीचा पती ऑफसेटपासून 2 मुली अन् एक मुलगा आहे, त्यांची नावे कल्चर, ब्लॉसम आणि वेव अशी आहेत. तर आता स्वत:च्या दुसऱ्या जोडीदारासोबत कार्डी बीने मुलाला जन्म दिला आहे.