कार्डबोर्ड खाण्याचा शाैकीन
एक लोकप्रिय शो ‘माय स्ट्रेंज अॅडिक्शन’मध्ये एक अशी कहाणी समोर आली आहे, जी ऐकून प्रत्येक जण दंग राहिला आहे. अमेरिकेच्या मेम्फिसशी संबंधित टेरी नावाच्या इसमाला कार्डबोर्ड खाण्याचे व्यसन आहे. तो बालपणापासूनच या सवयीत अडकून पडला आहे आणि आता वयाच्या 39 व्या वर्षीही हे जारी आहे. शोचा एपिसोड ‘हॉट ग्लू ईटर, कार्डबोर्ड कन्झम्पशन, ब्रेस्टफीडिंग’मध्ये टेरीने स्वत:ची पूर्ण कहाणी सांगितली, जी लोकांना स्तब्ध करणारी ठरली.
ही सवय मला वयाच्या 6 व्या वर्षी लागली. एकेदिवशी मी कार्डबोर्डचा तुकडा तोंडात टाकला आणि तो मला स्वादिष्ट वाटला. तेव्हापासून मी कार्डबोर्ड खाणे जारी ठेवले आहे. आता प्रत्येक खाद्यपदार्थात मी कार्डबोर्ड मिसळत असतो. सकाळी अंड्यासोबत ‘स्पेशल इंग्रीडिएंट’ म्हणून कार्डबोर्डचे छोटे तुकडे त्यावर टाकतो, जे त्याला ‘सबटल फ्लेवर’ प्राप्त करून देतात. माझा पसंतीचा ब्राउन बॉक्सचा कार्डबोर्ड आहे. अनेक प्रकारचे कार्डबोर्ड असतात, परंतु रेग्युलर ब्राउन बॉक्स सर्वात चांगला वाटतो, असे टेरी यांचे सांगणे आहे.
मेडिकल डिसऑर्डर
टेरीच्या या सवयीला डॉक्टर्स ‘पिका डिसऑर्डर’ ठरवितात. ही एक प्रकारची ईटिंग डिसऑर्डर असून त्यात लोक नॉन-फूड खाण्याच्या इच्छेचा अनुभव घेतात. पिकामध्ये लोक माती, कागद, केस, रंग, प्लास्टिक किंवा कार्डबोर्डसारख्या गोष्टी खातात. हे अनेकदा न्यूट्रिशनल डेफिशिएंसी, मेंटल हेल्थ समस्या (डिप्रेशन, एंक्झाइटी) किंवा ऑटिज्मशी निगडित असते. टेरीच्या प्रकरणी हे बालपणापासून सुरु असल्याने हे बहुधा इमोशनल ट्रॉमा किंवा सेंसरी इश्यूमुळे घडले असण्याची शक्यता आहे. ग्लू, इंक आणि डाय हे शरीरात विष परसवू शकते, दीर्घकाळापर्यंत खाल्ल्याने दात खराब होऊ शकतात, पोटात ब्लॉकेज, इंटेस्टाइनल डॅमेज, इंफेक्शन किंवा यकृताची समस्या निर्माण होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये पेपर किंवा कार्डबोर्ड खाल्ल्याने कोलन ऑब्स्ट्रक्शनपर्यंत पोहोचले आहे. टेरीला आतापर्यंत कुठलीही मोठी शारीरिक समस्या झालेली नाही, परंतु हे जारी राहिल्यास जीवघेणे ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
घरवाल्यांपासून लपवून खाण्याचा प्रकार
टेरी ही सवय परिवारापासून लपवितो. आईसोबत असताना तो सकाळी लवकर उठून खाद्यपदार्थ तयार करतो, जेणेकरून कुणी पाहू नये. कार्डबोर्डला प्रथम स्वच्छ करून घेतो, कोरडे करतो आणि मग छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडून तो खात असतो. कधीकधी कार्डबोर्ड ओला करून खाणे त्याला आवडते. तो स्वत:ला ‘कार्डबोर्ड किंग“ म्हणवून घेतो. कार्डबोर्ड खाल्ल्याने मला स्पेशल पॉवर मिळते, जसे स्पिरिच्युल अवेकनिंग. परंतु आतून मला समाज स्वीकारणार नसल्याची भीती असल्याचे टेरी यांनी म्हटले आहे.