Satara News : साताऱ्यात पुठ्याचे बॉक्स व्यवसाय फसवणूक प्रकरण, २८ लाख ४३ हजार रुपये गंडा
नवीन एमआयडीसीमध्ये व्यापाऱ्याला चार जणांनी घातला मोठा गंडा
सातारा : सातारा शहरालगत असलेल्या नवीन एमआयडीसीत पुठ्याचे बॉक्स तयार करण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला चार जणांनी २८ लाख ४३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेलीमाहिती अशी, अभिजित हणुमंत शिंदे (वय ३२, रा. गणेश कॉ लनी, संगमनगर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार हरिदास श्रीरंग चौरे (रा. उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे), कबलजितसिंग अमरजितसिंग बीरदी, रजिंदरसिंग जसपालसिंग बीरदी, सनलाईट एक्सपोर्ट आयएनसीचा मालक मनमित कौर या चौघांनी जुन २०२५ पासून पुठ्याचे बॉक्स तयार करण्याचे मशिन पुरवून ती इन्स्टॉल करून सुमारे १ वर्ष त्या मशिनचा मेन्स्टनन्स बघणार असल्याचे सांगून विश्वास संपादन करत शिंदे याच्याकडून आरटीजीएस तसेच फोन पे द्वारे वेळोवेळी २८ लाख ४३ हजार रुपये घेवून मशिनही दिली नाही आणि पैसेही दिले नाहीत. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.