For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आकेरीत अवैध दारू वाहतूक करणारी कार चालकासह ताब्यात

05:53 PM Jun 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आकेरीत अवैध दारू वाहतूक करणारी कार चालकासह ताब्यात
Advertisement

१ लाख ६० हजाराची दारू जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ शाखेची कारवाई

Advertisement

कुडाळ -

कुडाळ तालुक्यातील वेंगुर्ले - बेळगाव रस्त्यावर आकेरी - दांड्याचे गाळू येथे राज्य उत्पादन शुल्क कुडाळ शाखेच्या पथकाने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार पकडली. यात 1 लाख 60 हजार 800 रु. किंमतीची दारू व 3 लाख 50 हजार रुपये किंमतीची कार मिळून एकूण ५ लाख १० हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.तसेच कार चालक सुजल सचिन पवार ( 21, रा तेर्सेबांबर्डे, ता. कुडाळ ) याला ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाला वेंगुर्ले - बेळगाव या रस्त्यावरून गोवा बनावटीची दारू वाहतुक एका कार मधून केली जात आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (सिंधुदुर्ग ) चे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदशानाखाली राज्य उत्पादन शुल्क कुडाळ शाखेचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या पथकाने आपल्या ताब्यातील खासगी वाहनाने वेंगुर्ले - बेळगाव रस्ता आकेरी दांड्याचे गाळू (मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ८८ ) पुलाच्या नजीक पहाटेच्या सुमारास सापळा रचत वाहनांची तपासणी सुरू केली. दारूबंदी कायद्या अंतर्गत पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वाहनांची तपासणी सुरू असताना , तेथून जाणारी मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार तपासणीसाठी धाबविली.या कारमध्ये गोवा राज्यात विक्रीसाठी निर्मित केलेला परंतु महाराष्ट्र राज्यात विक्री साठी प्रतिबंधित केलेला गोवा बनावटी दारूचे विविध ब्रँडचे भरलेले खोके सापडले.यात 1 लाख 60 हजार 800 रु. किंमतीची दारू व 3 लाख 50 हजार रू .किमतीची कार मिळून एकूण ५ लाख १० हजार ८०० रू. किमतीचा मुद्देमाल जप्त केला. केला.कारचालक सुजल सचिन पवार याला वाहनासहित ताब्यात घेतले. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला.सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदशनाखाली कुडाळचे निरीक्षक एम. एच . गरुड यांच्यासह दुय्यम निरीक्षक यु. एस.थोरात, दुय्यम निरीक्षक श्रीमती ए. ए. वंजारी, सहायक दुय्यम निरीक्षक एस एस चौधरी, जवान ,एन पी राणे, जवान पी ए खटाटे, जवान वाहन चालक एस एम कदम ,जवान एस आर महेकर यांनी केली.पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. थोरात करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.