For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार विक्रेता निघाला राजपुत्र

06:40 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
कार विक्रेता निघाला राजपुत्र
Advertisement

भाग्य’ ही एक अनाकलनीय स्थिती आहे. ते कोणाचे, केव्हा आणि असे उजळेल हे निश्चित सांगता येणे कठीण आहे. युरोपमधील बेल्जियम या देशात अशी एक घटना घडली आहे, की जिच्यामुळे साऱ्या जगावर आचंबित होण्याची वेळ आली आहे. या देशातील एक कार विक्रेता (सेल्समन) वास्तविक एक राजपुत्र आहे, असे उघड झाले असून राजघराण्यात जन्म झालेल्या त्याच्या पित्याने आता त्याचा पुत्र म्हणून स्वीकारही केला आहे. अक्षरश: एका दिवसात हे घडले.

Advertisement

या विक्रेत्याचे नाव आहे क्लेमेंट वाँडेनकेकोव्ह. त्याचे वय 26 वर्षांचे आहे. आपला पिता नेमका कोण, हे या युवकाला त्याच्या जन्मापासून माहीत नव्हते. बेल्जियमच्या राजघराण्यात जन्मलेले राजपुत्र प्रिन्स लॉरेंट यांनी आता त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला आहे. क्लेमेंट वाँडेनकेकोव्ह हा बेल्जियमची जगद्विख्यात गायिका वेंडी व्हेनवाँटन हिचा पुत्र आहे. मात्र, वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत आपला पिता नेमका कोण हे त्याला माहीत नव्हते. त्याच्या मातेने त्याला याची माहिती दिली नव्हती. तो मोठा झाल्यानंतर त्याने एका कारच्या शोरुममध्ये विव्रेत्याची नोकरी करण्यास प्रारंभ केला. आपल्या देशाच्या राजघराण्याचा आणि आपला रक्ताचा संबंध आहे, हे सत्य त्याला समजल्यानंतरही त्याचा बराच काळ विश्वास बसला नाही. म्हणून वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत त्याने ही बाब लपवून ठेवली. 20 व्या वर्षी त्याने आपले पिता लॉरेंट यांना दूरध्वनी केला. त्यानंतर त्यांचा दूरध्वनीवरुन नेहमीच संवाद होत गेला. आपणच माझे पिता आहात, ही माझ्या मातेने दिलेली माहिती खरी आहे काय, असा प्रश्न त्याने विचारल्यानंतर पुढच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. दोघांचेही डीएनए परीक्षण करण्यात आले. त्यात प्रिन्स लॉरेंट हेच त्याचे पिता आहेत, ही बाब स्पष्ट झाली. दोघांचेही डीएनए 99.5 टक्के जुळून आले. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी एका शाही सार्वजनिक समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात बेल्जियमच्या शाही परिवाराने त्याचा आपला कुटुंबिय म्हणून स्वीकार केला. एक कार विक्रेता अशा प्रकारे त्याने ज्या घरात जन्मापासून असावयास हवे होते, तेथे वास्तव्यास गेला. त्याच्या मातेने त्याला त्याच्या जन्माचे गुपित सांगितले नसते, तर तो कारविक्रेताच राहिला असता.

Advertisement

Advertisement
Tags :

.