For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिझोरममध्ये दरीत कोसळली कार, तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू

06:46 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मिझोरममध्ये दरीत कोसळली कार   तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू
Advertisement

आयजोल: मिझोरमची राजधानी आयजोलपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर सताएक गावानजीक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक कार दरीत कोसळल्याने केंद्र सरकारच्या तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. आयजोल दूरदर्शनचे संचालक नाम्पिबोउ मारिनमाई आणि इंफाळ पीआयबीचे अतिरिक्त महासंचालक एंगम पामे यांचा मृतांमध्ये समावेश आहे. उत्तरीय तपासणीनंतर या अधिकाऱ्यांचे मृतदेह मणिपूरमधील त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत.

Advertisement

या दुर्घटनेत सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनचे अधिकारी एच. लियानवेला यांनाही जीव गमवावा लागला आहे. तर सीबीसी आयजोलचे संचालक गोजेंद्रो डे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चारही अधिकारी सियल्सुक गावातून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. ड्रायव्हिंगवेळी चालकाची प्रकृती अचानक बिघडल्याने ही दुर्घटना घडल्याचे समजते. मिझोरम जर्नलिस्ट्स असोसिएशनने तीन अधिकाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री लालदुहोमा, मिझो नॅशनल फ्रंटचे अध्यक्ष जोरमथांगा आणि मिझोरम काँग्रेसचे अध्यक्ष लाल थानजारा यांनी देखील शोक व्यक्त केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.