थिवी चर्चजवळील उतारावर कार नाल्यात कोसळली; चालकाचा ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती
11:45 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
थिवी : थिवी चर्च उताराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कार कोसळल्याची घटना घडली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार नाल्यात कोसळल्यानंतर परिसरात काही काळ गर्दी झाली होती. अपघातातील चालकाची प्रकृती आणि त्याला दुखापत झाली आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
या घटनेबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण तसेच चालकाच्या स्थितीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
Advertisement
Advertisement