जर्मनीत गर्दीत घुसविली कार, 2 जण ठार
06:08 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
लीपजिग
Advertisement
जर्मनीच्या लीपजिग शहरात एक भरधाव कार गर्दीत शिरल्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत. ही घटना शॉपिंग एरिया ग्रिमाइशे श्ट्रासे येथे घडली आहे. कार ऑगस्टसप्लात्ज येथून गर्दीत शिरली आणि अनेक लोकांना टक्कर मारत पुढे जात राहिली. या दुर्घटनेत 63 वर्षीय महिला आणि 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी 33 वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यामागील उद्देश अद्याप स्पष्ट नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Advertisement
Advertisement