For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावगावनजीक कार उलटली; प्रवासी किरकोळ जखमी

11:24 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
सावगावनजीक कार उलटली  प्रवासी किरकोळ जखमी
Advertisement

बेळगाव : भरधाव कार रस्त्याशेजारी कलंडल्याची घटना बेनकनहळ्ळी-सावगाव रस्त्यावर घडली. या घटनेत कारमधील लोक किरकोळ जखमी झाले असून केवळ सुदैवाने प्राणहानी झाली नाही. रविवारी ही घटना घडली. या घटनेची माहिती समजताच काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातातील जखमींची विचारपूस केली. तसेच या घटनेची माहिती घेतली. ज्या ओढ्याजवळ घटना घडली होती, त्या परिसरात अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.