महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संगोळ्ळीनजीक कारची पाईपला धडक; बालकाचा मृत्यू

12:10 PM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रॉक गार्डन पाहून गावी परत जाताना काळाचा घाला

Advertisement

वार्ताहर/बाळेकुंद्री

Advertisement

कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाण्याच्या पाईपला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सात वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना  मंगळवारी बैलहोंगल तालुक्यातील संगोळ्ळी गावाजवळ घडली. या अपघातात  गोकाक तालुक्यातील हनमापूर गावचा रमेश तोळीनवर असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. संक्रांती सणादिवशीच काळाने घाला घातल्याने तोळीनवर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गोकाक तालुक्यातील हनमापूर गावचे तोळीनवर कुटुंब कारने बैलहोंगल तालुक्यातील संगोळ्ळी येथील रॉक गार्डन बघण्यासाठी आले होते. दुपारी जेवण करून परत आपल्या गावी जात असताना संगोळ्ळीजवळच कार चालकाने ओव्हरटेक करताना पाणीपुरवठा करण्यासाठी ठेवलेल्या पाईपला जोरदार धडक दिली. कारमध्ये बसलेल्या रमेश या बालकाला जबर मार बसल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सिमेंट पाईपला जोरदार धडक दिल्याने कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला. बैलहौंगल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

कुटुंबीयांचा एकच आक्रोश

बालकाचा मृत्यू झाल्याची बातमी हनमापूर गावात पसरताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. सणादिवशीच बालकाचा मृत्यू झाल्याने सारे गावच हळहळत होते. कुटुंबाचा आक्रोश पाहून त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article