For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारची बसला धडक; पाच ठार

06:22 AM Feb 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
कारची बसला धडक  पाच ठार
Advertisement

बेंगळूरनजीक भीषण अपघात : बसमधील 42 प्रवासी सुखरुप

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

भरधाव कारने दुभाजक ओलांडून केएसआरटीसी बसला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा ऊग्णालयात मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री बेंगळूरच्या मादनायकनहळ्ळी येथील जिंदालजवळ ही घटना घडली. धडकेमुळे बसचे नुकसान झाले असून समोर बसलेल्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली तर उर्वरित 42 प्रवासी सुखरुप बचावले आहेत.

Advertisement

दुर्गाप्रसाद (वय 20), केशव (वय 19), ललितकुमार (वय 22), हर्षित (वय 20) आणि धनुष (17) अशी मृतांची नावे आहेत. बसच्या कंडक्टर, ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली आहे. तुमकुरहून येणाऱ्या इंडिका कारने जिंदालजवळ दुभाजक ओलांडून बेंगळूरहून येणाऱ्या केएसआरटीसी बसला जोराची धडक दिली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत हर्षित हा साई विद्या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो रात्री 8.30 वाजेपर्यंत घरीच होता आणि नंतर एका मित्राला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता त्याच्यासह पाच जण तुमकूरहून बेंगळूरकडे एका कारमधून येत होते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कारने दुभाजक ओलांडून बसला जोराची धडक दिली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच मादनायकनहळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह विच्छेदनासाठी नेलमंगल सरकारी रुग्णालयात पाठवून दिले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गेल्या शुक्रवारीच, बेंगळूर ग्रामीण जिल्ह्याच्या होस्कोटे तालुक्मयातील एम सत्यवरम गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा बळी गेला होता. सदर घटना ताजी असतानाच आणखी एका अपघातात पाच जण ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.