कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाटूळ-दाभोळे मार्गावर कार चालकाने तीन महिलांना उडवले

12:40 PM Aug 18, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

लांजा :

Advertisement

तालुक्यातील वाटूळ-दाभोळे मार्गावरील विलवडे ग्रामपंचायत होळीचा मांड येथे रस्त्याच्या कडेने चालत असलेल्या तीन महिलांना पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने जोरदार ठोकर दिली. या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून एक महिला किरकोळ जखमी झाली. गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून कार चालकावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम सोमा राज्ये (५३, रा. विलवडे वाकीवाडी, ता. लांजा) यांनी लांजा पोलिसात फिर्याद दिली. जयश्री जयवंत कोंडसकर, योगीता चंद्रकांत चौगुले व वासंती चंद्रकांत मालपेकर (तिन्ही रा. वाकेड गावकरवाडी, ता. लांजा) या तिघी महिला आणि फिर्यादी शांताराम राज्ये हे मजुरीचे काम करतात. वाकेड येथून या तिन्ही महिला नेहमी विलवडे येथे मजुरीच्या कामासाठी जातात. नेहमीप्रमाणे त्या शुक्रवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास त्या आपले काम आटोपून वाकेड येथे घरी येत होत्या. वाटूळ-दाभोळे रस्त्यावरील शिरवली फाटा येथील विलवडे ग्रामपंचायत, होळीचा मांड येथे रस्त्याच्या कडेने या तिन्ही महिला चालत असताना पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने (एमएच ०१ ईजे ८५३५) या तिन्ही महिलांना ठोकर देवून उडवले. या अपघातात जखमी झालेल्या तिन्ही महिलांना प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातात किरकोळ जखमी असलेल्या जयश्री कोंडसकर या महिलेवर उपचार करण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या योगीता चौगुले व वासंती मालपेकर या दोन्ही महिलांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातप्रकरणी स्विफ्ट डिझायर कारचालक नितीन चंद्रकांत परब (४७, रा. माहीम मुंबई) याच्यावर भरधाव वेगाने कार चालवत तिन्ही महिलांच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article