For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भोम येथे कारची देवस्थानच्या पेडाला धडक

06:30 AM Jun 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
भोम येथे कारची देवस्थानच्या पेडाला धडक
Advertisement

एक ठार, चौघे जखमी : सर्व प्रवासी धारवाड कर्नाटकातील

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

फोंडा : भोम येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या देवस्थानच्या पेडाला कारची धडक बसून झालेल्या अपघातात कर्नाटक राज्यातील एक युवक जागीच ठार झाला तर चार प्रवासी जखमी झाले आहेत. फोंडा-पणजी महामार्गावर काल शनिवारी सकाळी 7.15 वा. सुमारास हा अपघात झाला.

Advertisement

त्रिलोकनाथ हिरेमठ (26, रा. कलबुर्गी कर्नाटक) असे मृत तरुणाचे नाव असून मौनेश एम. (42), सचिन आळंदकर (47), बसलिंगप्पा धट्टंगाव (40) आणि शिवकुमार (40) हे कारगाडीतील अन्य चार प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरु आहेत. हे सर्व जण धारवाड-कर्नाटक येथील रहिवासी आहेत. म्हार्दोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार के.ए. 32 झेड 4641 या क्रमांकाच्या खासगी कारगाडीतून हे सर्वजण कामानिमित्त गोव्याहून रत्नागिरीकडे निघाले होते. धारवाड येथून शुक्रवारी सायंकाळी  ते प्रवासाला बाहेर पडले होते. वाटेत थोडी विश्रांती घेऊन रात्रभर प्रवास करीत सकाळी ते फोंड्यात पोचले. पुढे पणजीकडे जात असताना भोम येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने व त्यांची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या देवस्थानच्या पेडावर जोरदार धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला व मागच्या सीटवर बसलेल्या त्रिलोकनाथ हिरेमठ याचा जागीच मृत्यू झाला. अन्य चौघे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. म्हार्दोळ पोलिसांनी घटनास्थळी

Advertisement
Tags :

.