For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारची कंटेनरला धडक;आई-मुलगी जागीच ठार

11:54 AM Mar 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
कारची कंटेनरला धडक आई मुलगी जागीच ठार
Advertisement

उडुपी जिल्ह्यातील मावूंद येथील घटना

Advertisement

कारवार : जिल्ह्यातील मुर्डेश्वर-गोकर्ण येथे देवदर्शनासाठी येत असलेल्या भाविकांच्या कारने रस्त्यावर थांबलेल्या कंटेनरला जोराची धडक दिल्याने आई-मुलगी जागीच ठार तर अन्य चार जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री कारवार आणि उडुपी जिल्ह्यांच्या सीमेवरील मावूंद (ता. बेंदूर) राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर घडली. अपघातात ठार झालेल्या आई व मुलीचे नाव ममता (वय 36), धृतीका (वय 14) असे आहे. अपघातात जखमी झालेल्यांची नावे राघू (वय 40), जान्हवी (वय 12), चार्वी (वय 10) आणि किरण अशी आहेत.

या अपघाताबाबत समजलेली अधिक माहिती अशी, बेंगळूर येथील एक कुटुंब उडुपी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देऊन एर्टीगा कारमधून कारवार जिल्ह्यातील गोकर्ण आणि मुर्डेश्वरकडे येत होते. उडुपी जिल्ह्यातील बैदूर तालुक्यातील मावूंद येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर थांबविण्यात आलेल्या कंटेनरला कारने जोराची धडक दिली. या अपघातात ममता आणि धृतीका जागीच ठार झाल्या. तर अन्य चारजण गंभीरित्या जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कुंदापूर येथील आदर्श रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर किरण याला मणिपाल येथील केएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बैंदूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.