कोलकाता विमानतळावर कारची विमानाला धडक
06:02 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ कोलकाता
Advertisement
कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो विमानाला एका कारची धडक बसली. ही घटना पार्किंग बे क्रमांक 51 मध्ये घडल्याचे सांगण्यात आले. विमानतळावर विमान पार्क केलेले असताना तेथे एक केटरिंग वाहन अचानक पुढे आले. विमानाच्या इंजिनला कार धडकल्यामुळे किरकोळ नुकसान झाले. या घटनेनंतर तपासणी आणि देखभालीसाठी विमान थांबवण्यात आले होते. हे विमान कोलकाताहून गुवाहाटीला जाणार होते. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने गुवाहाटीला पाठवण्यात आले.
Advertisement
Advertisement