Solapur News | सोलापूरच्या मरीआई चौकातील भररस्त्यात गाडीला आग
03:33 PM Feb 25, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
सोलापूरमध्ये संभाव्य भीषण दुर्घटना टळली;
Advertisement
सोलापूर - सोलापूरच्या मरीआई चौकात भररस्त्यात उभी असलेल्या गाडीला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षणात ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मात्र याच वेळी महाराष्ट्र टीचे मालक समीर पटेल यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ पुढाकार घेतला. पाण्याच्या सहाय्याने त्यांनी आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला.
Advertisement
त्यांच्या धाडसी आणि प्रसंगावधानपूर्ण कृतीमुळे काही मिनिटांतच परिस्थिती नियंत्रणात आली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, काही क्षणांचा उशीर झाला असता तर शेजारील वाहने आणि दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असती. समीर पटेल यांच्या सतर्कतेमुळे एक संभाव्य भीषण दुर्घटना टळली असून परिसरात त्यांच्या धाडसाचे जोरदार कौतुक होत आहे.
Advertisement