For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांबोळी येथे कार अपघात कार पेटली, एकाचा आगीत होरपळून मृत्यू

06:58 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांबोळी येथे कार अपघात कार पेटली  एकाचा आगीत होरपळून मृत्यू
Advertisement

दोघे गंभीर जखमी मद्यपान करून कार चालविल्याप्रकरणी गुन्हा नोंद

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

पणजी : बांबोळी येथील ‘फुलाचो खुरीस’ येथे एका कारला स्वयंअपघात होऊन कारने पेट घेतल्याने आगीच्या भडक्यात एकाचा होरपळून मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे.

Advertisement

पहाटेची वेळ... राष्ट्रीय महामार्गावर पसरलेली शांतता... आणि अचानक झालेल्या या प्रचंड आवाजाने परिसर हादरला! पणजीहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या फोर्ड इकोस्पोर्ट कारला राष्ट्रीय महामार्ग 66 वर दुर्दैवी अपघात झाला.

याबाबत आगशी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने कारवर पाण्याचा फवारा मारीत आग पूर्णपणे विझवली. जखमींना गोमेकॉत दाखल केले आणि पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. कारचालक मद्यपान करून कार चालवत असल्याने हा अपघात झाला असल्याच्या शक्यतेवरून आगशी पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत झालेल्या व्यक्तीचे नाव यश किरण मेहता  (वय 19, हरि मंदिर चाळ मडगाव) असून कारचालक हर्ष जैन  (वय 18, मडगाव) तनिश पुरी, (वय 18  राया) असे आहेत. कार अतिशय वेगात होती त्यात कारचालकाने मद्यपान केले होते त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. कार महामार्गावरील दुभाजकाला जोरदार धडक देऊन थेट बगल मार्गावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, क्षणात कारच्या इंजिनने पेट घेतला आणि काही मिनिटांतच संपूर्ण कार धगधगत्या आगीच्या गोळ्यात ऊपांतरित झाली.

कारमध्ये तीन तऊण प्रवास करत होते. गाडीला अचानक भीषण आग लागल्याने आत अडकलेल्या तऊणांमध्ये प्रचंड घबराट पसरली. आगीच्या ज्वाळा आणि धुराच्या लोटामुळे एका तऊणाला बाहेर पडता आले नाही आणि त्याचा गाडीतच वेदनादायक अंत झाला. तर गंभीर दुखापत झालेल्या इतर दोन तऊणांना वेळीच बाहेर काढण्यात यश आले.

भीषण अपघातात सापडलेले तिघ तऊण हे मडगाव भागातील असून रात्रीच्यावेळी कुठे गेले होते आणि पहाटेपर्यंत काय करीत होते. त्यात कार चालकाने मद्यपान केले असल्याचे आढळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या संपूर्ण दुर्घटनेबाबत आगशी  पोलिस स्थानकाचे पथक सखोल तपास करीत आहेत. पहाटेच्यावेळी घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.