For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झारापला गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी कार पकडली

12:39 PM Nov 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
झारापला गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी कार पकडली
Advertisement

दोघांना घेतले ताब्यात ; राज्य उत्पादन शुल्क कुडाळ शाखेची कारवाई

Advertisement

कुडाळ -

मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे राज्य उत्पादन शुल्क कुडाळ शाखेच्या पथकाने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी वॅगनार कार पकडली. यात गोवा बनावटीची 94 हजार 560 रु. किमतीची गोवा बनावटीची दारू व 1 लाख 25 हजार रु.किमतीची वॅगनार कार मिळून एकूण 2 लाख 19 हजार 560 रु. चा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क कुडाळ शाखेचे दुय्यम निरीक्षक उदय थोरात यांना मुबई गोवा महामार्गावरून एका कार मधून गोवा बनावटीची दारू वाहतूक केली जात आहे,अशी खात्रीशीर व गोपनीय माहिती आज मिळाली.त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खासगी वाहनाने महामार्गावर झाराप येथे सापळा रचला. या दरम्यान महामार्गावरून येत असलेली वॅगनार कार थांबविली आणि त्या कारची तपासणी केली.तेव्हा सदर कारमध्ये गोवा बनावटी दारुचे एकूण १२ खोके आढळले. या खोक्यातील 94 हजार 560 रु.ची गोवा बनावटीची दारू जप्त केली.तसेच 1 लाख 25 हजार रू ची कार जप्त केली. एकूण 2 लाख 19 हजार 560 रुग्.चा मुद्येमाल दारुबंदी गुन्हयांतर्गत ताब्यात घेत जप्त केला.सदर कार चालक तुषार रमेश मोरजकर (३२ रा.पिंगुळी ) व त्याचा साथीदार अविनाश प्रकाश लोके (४४,रा. बिबवणे ) या दोघांना ताब्यात घेतले. सदरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मागदर्शनाखाली निरीक्षक मिलींद गरुड व दुय्यम निरीक्षक उदय थोरात यांनी केली. त्यांना सदर कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक सौ. अर्चना वंजारी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी, जवान वैभव कोळेकर, प्रसाद खटाटे, नंदकुमार राणे , जवान व वाहनचालक संदिप कदम ,मदतनीस अवधूत सावंत, विजय राऊळ व प्रशांत परब यांनी मदत केली.पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री.थोरात करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.