अपेक्षाभंग करणारे कर्णधार
06:00 AM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
यंदाच्या ‘आयपीएल’ची साखळी फेरी अत्यंत चुरशीच्या 70 सामन्यांनंतर संपुष्टात आलीय अन् आता मुकुटाचा मानकरी ठरण्यासाठी, मोसमावर पडदा पडण्यासाठी राहिल्याहेत त्या केवळ दोन लढती...या संपूर्ण हंगामात 10 संघांच्या कर्णधारांचा प्रवास आपापल्या परीनं वेगळा राहिलाय. त्यातील खराब कामगिरी केलेल्या पाच जणांवर टाकलेली ही नजर... यंदा ‘आयपीएल’च्या इतिहासात पहिल्यांदाच नऊ भारतीय कर्णधारांनी संघांची धुरा सांभाळली अन् केवळ एकाच चमूची सूत्रं परदेशी कर्णधाराकडे राहिली...
Advertisement
त्यापैकी अत्यंत निराशाजनक कामगिरी करणारं एक नाव म्हणजे रिषभ पंत...लखनौ सुपर जायंट्सचा पंतला विक्रमी 27 कोटी ऊपयांना संघात घेण्याचा आणि त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय पूर्णपणे फसला...‘एलएसजी’ केवळ आठ गुणांसह गुणतालिकेत तळाशी राहिला आणि ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीतून बाहेर पडणारा तो पहिला संघ ठरला...पंतचं नेतृत्व फारच गोंधळलेलं होतं. फलंदाजीच्या क्रमात त्यानं केलेल्या प्रयोगांचा परिणाम धोकादायक फलंदाज असलेल्या निकोलस पूरनच्या कामगिरीवर झाला. शिवाय कर्णधारपदाच्या दबावाचा परिणाम त्याच्या फलंदाजीवरही होऊन मागील दोन हंगामांत त्याला 28 लढतींत केवळ 581 धावा करता आल्याहेत (यंदा 14 सामन्यांतून 312)...
हार्दिक पांड्या या यादीत अगदी तळाशी नसण्याचं एकमेव कारण म्हणजे मुंबई इंडियन्सची हंगामातील पहिल्याच सामन्यात पराभूत होण्याची मालिका त्यानं खंडित केली. त्याव्यतिरिक्त मुंबईसाठी हा संपूर्ण मोसम अत्यंत निराशाजनक राहिला...सूर्यकुमार यादव व जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू असूनही त्यांना केवळ आठ गुण नोंदवता आले. यामागील बराचसा भाग हा पांड्याच्या कर्णधारपदाशी संबंधित. त्याला मुंबईचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर गुजरात टायटन्सतर्फे मिळविलेल्या यशाची पुनरावृत्ती करणं कठीण गेलंय. नाणेफेकीच्या वेळी हार्दिकनं आक्रमक वक्तव्यं केलेली असली, तरी प्रत्यक्षात संघाची मैदानावरची कामगिरी अत्यंत सुमार राहिली...शिवाय सामन्यानंतरच्या मुलाखतींमध्ये त्यानं संघावर सतत केलेली टीका आणि ‘केकेआर’विऊद्धच्या लढतीत पाहायला मिळाल्याप्रमाणं मैदानावर असताना गमावलेला संयम अशा घटनाही वारंवार घडल्या...
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सची सुऊवात अत्यंत निराशाजनक झाली आणि त्यांना पहिले तीन सामने गमवावे लागले. गायकवाडला आपल्या तऊण आणि अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या संघाला कोणताही दिलासा किंवा स्थैर्य देण्यात अपयश आलं...या संघानं चिंताजनक वाटावेत इतके झेल सोडले, तर दुसरीकडे गोलंदाजांनी महत्त्वाच्या सामन्यांत भरभरून धावा दिल्या. अखेरीस ‘सीएसके’ 12 गुणांसह आठव्या स्थानावर राहिला आणि एकेकाळी स्पर्धा गाजवणाऱ्या या संघाला पुन्हा लवकर गाशा गुंडाळावा लागला...
कोलकाता नाईट रायडर्सचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आल्यामुळं अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर आणि नेतृत्वावर मोठे प्रश्न निर्माण झालेत. शांत व संयमी रहाणेला आधीच असंतुलित असलेल्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यात अपयश आलं. शिवाय त्याच्या काही वादग्रस्त निर्णयांचा फटकाही संघाला बसला. खराब फॉर्ममध्ये असलेल्या रमणदीप सिंगला संघात कायम ठेवून मनीष पांडेला फारशी संधी न देण्याचा रहाणेचा पवित्रा टीकेचा धनी ठरलाय. हंगामाची सुऊवात अत्यंत निराशाजनक झाली असली, तरी ‘केकेआर’नं पुढं सलग सहा सामने जिंकण्याची किमया साधली खरी, मात्र गाडी रुळावर येईपर्यंत उशीर झाला होता...
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचे या हंगामातील निकाल समाधानकारक नव्हते आणि संघ सहाव्या स्थानावर राहिला...अक्षरकडून यावेळी काही विचित्र निर्णय पाहायला मिळाले. उदाहरणार्थ ‘आरसीबी’ आणि सनरायझर्स हैदराबादविऊद्धच्या सामन्यांमध्ये स्वत: गोलंदाजी न करणं किंवा कुलदीप यादवकडे चेंडू न सोपविणं, त्याऐवजी कामचलावू फिरकी गोलंदाज नितीश राणावर विसंबून राहणं...त्याचप्रमाणं फलंदाजीमध्येही त्याला फारशी चमक दाखवता आली नाही अन् काढता आल्या त्या केवळ 173 धावा...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement