8 कंपन्यांचे भांडवलमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या 10 पैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मागच्या आठवड्यात 1.29 लाख कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. मागच्या आठवड्यात सोमवारी ख्रिसमसनिमित्त शेअरबाजार बंद होता, त्यामुळे चारच दिवस बाजाराचे कामकाज चालले. याचदरम्यान मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1133 अंकांनी वधारला होता. याशिवाय निर्देशांकाने 72,484 अंकांची सर्वोच्च पातळी 28 डिसेंबरला गाठली होती. रिलायन्स इंडस्ट्रिज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, आयटीसी, स्टेट बँक आणि एलआयसी यांच्या बाजार भांडवलात मागच्या आठवड्यात वृद्धी दिसून आली आहे. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 29 हजार 828 कोटींनी वाढत 12 लाख 97 हजार 972 कोटींवर पोहचले.
यादिवशी शेअर बाजार असेल बंद
2024 वर्षात शेअर बाजार एकंदर
14 दिवस बंद राहणार आहे.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन
8 मार्च महाशिवरात्र
26 मार्च होळी
29 मार्च गुड फ्रायडे
11 एप्रिल ईद उल फित्र
17 एप्रिल राम नवमी
1 मे महाराष्ट्र दिन
17 जून बकरीद
17 जुलै मोहरम
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती
1 नोव्हेंबर दिवाळी
15 नोव्हेंबर गुरुनानक जयंती
25 डिसेंबर ख्रिसमस
(सूचना- यात ऐनवेळी बदल शक्य आहे. 1 नोव्हेंबर रोजी विशेष मुहूर्त ट्रेडिंग आयोजीत होते.)