For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खाणकाम-बांधकाम क्षेत्रातील भांडवली खर्च दुप्पट होणार

06:11 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
खाणकाम बांधकाम क्षेत्रातील भांडवली खर्च दुप्पट होणार
Advertisement

2030 पर्यंत हा बदल होणार अहवालामधून स्पष्ट  : भारताची जागतिक उत्पादन केंद्राकडे वाटचाल

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली+

भारतातील खाणकाम आणि बांधकाम उपकरणे संबंधित क्षेत्रांमधील भांडवली खर्च 2030 पर्यंत पुढील चार वर्षांत 10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल, जो 2025 पर्यंतच्या 5 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या दुप्पट आहे. ही माहिती कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि अकाउंटिंग व कन्सल्टिंग फर्म बीसीजी (बीसीजी) यांच्या एका अहवालात उघड झाली आहे.

Advertisement

हा अहवाल भारताला जागतिक खाणकाम आणि बांधकाम उपकरणे उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी एक आराखडा सादर करतो. अहवालानुसार, भारतातील या उद्योगाचा अंदाजित बाजार आकार 17 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे आणि तो दरवर्षी 10 ते 12 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान यामध्ये रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळे, शहरी पायाभूत सुविधा, खाणकाम आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधील सातत्यपूर्ण गुंतवणुकीवर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामुळे खाणकाम आणि बांधकाम उपकरणे संबंधित क्षेत्रांमधील भांडवली खर्चाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. देशाच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी श्ण्ं क्षेत्राकरिता संधी आणि आवश्यक धोरणात्मक हस्तक्षेपांची सूचना अहवालात देण्यात आली आहे.

सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी म्हणाले, ‘खाणकाम आणि बांधकाम उपकरणे क्षेत्र हे भारताच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाच्या महत्त्वाकांक्षेचा एक अविभाज्य भाग आहे. त्याच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी उद्योग आणि सरकार यांच्यात अधिक सखोल सहकार्य, तसेच अधिक गुंतवणूक, नावीन्य, कौशल्य विकास आणि व्यवसाय सुलभतेची आवश्यकता असेल.’

निर्यातदार देश

‘देश खाणकाम आणि बांधकाम उपकरणांचा निव्वळ आयातदार देश न राहता निव्वळ निर्यातदार देश बनला आहे.’ निर्यातीसाठी एक मजबूत पाया तयार होत  आहे. जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळ्या नवीन स्वरूप धारण करत आहेत आणि भू-राजकीय धक्प टाळण्यासाठी कंपन्या चीनकडून होणारी खरेदी इतरत्र वळवत आहेत. यामुळे भारताला खाणकाम आणि बांधकाम उपकरणांच्या निर्यातीच्या क्षेत्रात स्वत: ला स्थापित करण्याची संधी मिळत आहे.

Advertisement
Tags :

.