For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंट शाळेच्या विद्यार्थ्यांची लोकमान्य ग्रंथालयाला भेट

12:14 PM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंट शाळेच्या विद्यार्थ्यांची लोकमान्य ग्रंथालयाला भेट
Advertisement

बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी शाळेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य बाल ग्रंथालयाला शुक्रवारी भेट दिली. ग्रंथालयाच्यावतीने शाळेतील मुलांना वाचनाची गोडी लागावी. तसेच ज्ञानात भर पडावी. यासाठी विविध स्पर्धा व उपक्रम घ्ण्यात आले. लोकमान्य सोसायटीच्यावतीने या ठिकाणी ‘उबंटू’ हा चित्रपट दाखविण्यात आला.बालग्रंथालयाच्यावतीने छाया सुतार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘आला किनारा’ हे गीत सादर केले. व्यासपीठावर मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे, संतोष दरेकर, उदय पाटील, ग्रंथालयाचे व्यवस्थापक नागेश जन्नू, उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वरा सावंत हिने केले. अदिती आजरेकर यांनी आभार मानले. मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे यांनी ग्रंथालयाच्या संचालिका डॉ. शोभा नाईक व इतरांचे आभार मानले. यावेळी शिक्षक धनाजी कुरणे, श्रीकांत काटकर, तुषार कांबळे, निता गुंजीकर, मनीषा वड्डगोळ, रेणुका अंबी, रेणुका सरमळकर यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.