महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंट नोकर भरती गैरव्यवहार प्रकरणाला पुन्हा गती

10:27 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्मचाऱ्यांची बेंगळूर वारी : पुन्हा एकदा चर्चांना उधाण

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील नोकर भरती गैरव्यवहार प्रकरणाला पुन्हा एकदा गती आली आहे. सीबीआयने कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांना बेंगळूर येथे बोलावून त्यांना गुन्हे दाखल केल्याची प्रत देऊ केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली असून गुन्हे दाखल केलेल्या 19 जणांवर लवकरच कारवाई केली  जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 2022-23 या वर्षात कॅन्टोन्मेंटमध्ये 29 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. शिपाई, वॉचमन, हमाल, कुली, चौकीदार, मजदूर या पदांसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. याची तक्रार नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांनी पेंद्रीय चौकशी यंत्रणांकडे केली होती. तेव्हापासून कॅन्टोन्मेंट गैरव्यवहाराची चौकशी सुरू होती. चौकशी सुरू असतानाच 25 नोव्हेंबर 2023 ला कॅन्टोन्मेंटचे तत्कालीन सीईओ के. आनंद यांनी जीवन संपविले. त्यानंतर थांबलेली सीबीआय चौकशी काही दिवसांनी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

 बेंगळूरमध्ये गुन्हे दाखल

प्रत्येक पदासाठी 15 ते 25 लाख रुपये घेतले असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. कॅन्टोन्मेंटमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याच मर्जीतील, तसेच नातेवाईकांमधील उमेदवारांची निवड केल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये स्पष्ट केले होते. 21 जून 2024 मध्ये बेंगळूरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. मागील दोन दिवसांपासून कॅन्टोन्मेंट गैरव्यवहार प्रकरणातील कर्मचाऱ्यांना सीबीआयने बेंगळूरमध्ये बोलाविले होते. बेंगळूर येथे त्यांना एफआयआरची प्रत देण्यात आली. उर्वरित कर्मचारी शुक्रवारी बेंगळूरला गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून थंडावलेली कारवाई पुन्हा एकदा सुरू झाल्याने पुढे काय होणार? हे पहावे लागणार आहे.

निलंबनाची टांगती तलवार

कॅन्टोन्मेंट नोकर भरती गैरव्यवहार प्रकरणी एकूण 19 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले. यापैकी 14 कर्मचारी तर पाच अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी आहेत. जून 2024 मध्ये सीबीआयने बेंगळूर येथे या सर्वांवर गुन्हे दाखल केले होते. या कर्मचाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई होणार? असा प्रश्न मागील दोन महिन्यांपासून उपस्थित करण्यात येत होता. परंतु आता सीबीआयने कणखर भूमिका घेतल्याने या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article