महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विकासकामांच्या निधीबाबत चर्चेसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डची उद्या बैठक

11:16 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये पुढील वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या विकासकामांना लागणाऱ्या निधीबाबत नियोजन करण्यासाठी शुक्रवार दि. 14 रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डची विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये विकासकामांना लागणारा निधी, तसेच आवश्यक असलेले नवीन प्रकल्प यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत बैठकीदरम्यान चर्चा केली जाणार आहे. यावर्षी 9 कोटी रुपयांपर्यंतची विकासकामे मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठविली जाणार आहेत. त्यापैकी मंजूर झालेल्या कामांनाच निधी दिला जाणार आहे. मागील वर्षभरात कॅन्टोन्मेंटमधील अनेक प्रकल्प प्रस्तावित असल्याने त्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मागील तीन महिन्यांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा झाली नव्हती. यामुळे विकासकामांना खीळ बसली होती. आता शुक्रवार दि. 14 रोजी सकाळी 10 वाजता कॅन्टोन्मेंटची बैठक निश्चित करण्यात आली असल्याने अनेक विकासकामांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article