कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बुधवारी पहाटेपर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डची चौकशी

12:40 PM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महत्त्वाचे धागेदोरे सीबीआयच्या हाती

Advertisement

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये एका तक्रारीची दखल घेऊन दिल्ली येथील सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. मंगळवारी दाखल झालेले हे पथक बुधवारी पहाटे पावणेचारपर्यंत कॅन्टोन्मेंट ऑफिसमध्येच होते. महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर ते धारवाडला रवाना झाले. या प्रकरणाबाबत अद्याप कमालीची गुप्तता पाळली जात असली तरी लवकरच संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सीबीआयचे पथक मंगळवारी दुपारनंतर अचानक कॅन्टोन्मेंट कार्यालयात दाखल झाले. यामुळे कर्मचाऱ्यांसह सर्वांचेच धाबे दणाणले. कार्यालयातील कागदपत्रे तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये सोडले नाही तसेच आत मधील एकही अधिकारी अथवा कर्मचारी कारवाई संपेपर्यंत बाहेर पडला नाही. पहाटे पावणेचारपर्यंत सर्व कारवाई करण्यात आली. त्यानंतर सीबीआयचे पथक पुढील कारवाईसाठी धारवाडला रवाना झाले. त्यामुळे रात्रभर कॅन्टोन्मेंटचे कार्यालय सुरू असल्याचे चित्र दिसून आले. कारवाई संपल्यानंतर अधिकारी पहाटे साडेचारनंतर घरी परतले.

Advertisement

अधिकाऱ्यांचे जेवण देखील कार्यालयातच 

कार्यालयात गेलेले सीबीआयचे पथक कारवाई संपेपर्यंत बाहेर पडले नाही. अगदी मंगळवारी रात्री जेवणासाठीही अधिकारी बाहेर आले नाहीत.  बाहेरून जेवण मागून त्यांनी कार्यालयातच जेवण केले. मागील महिनाभरात कार्यालयात आलेल्या व्यक्तींचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते. सीसीटीव्हीचे महत्त्वाचे धागेदोरे ते आपल्या सोबत घेऊन घेण्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कारवाईबाबत गुप्तता

सीबीआयकडून सीसीटीव्ही तसेच इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर महत्त्वाचे धागेदोरे सीबीआयच्या हाती आल्यानंतर ते माघारी फिरले. परंतु या घडलेल्या प्रकरणाबद्दल कॅन्टोन्मेंटमध्ये कमालीची गुप्तता पाण्यात आली आहे. बुधवारी करण्यात याबाबत कुठेही वाच्यता करण्यात येत नव्हती. कारवाईमुळे कार्यालयामध्ये शुकशुकाट जाणवला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article