हसणे, खेळणे होत नाही सहन
महिलेला अजब आजार
जगभरात काही लोकांमध्ये विचित्र आजार आढळून येतो, अनेकदा या आजारांवरील उपचार विज्ञानातही मिळत नाही. पेनफुल हायपरॅक्यूसिस नावाच्या एका दुर्मिळ स्थितीने पीडित एका महिलेने स्वत:चा भीतीदायक अनुभव मांडला आहे.
दैनंदिन जीवनातील गोंगाट, मुलांचा हसण्याचा आवाज, मित्रांचा आवाज किंवा संगीत देखील माझ्या कानांसाठी वेदनेचे कारण ठरते. 18 महिन्यांपूर्वी पर्यंत मी एक केबिन क्रू म्हणून काम करत होते अणि पती आणि दोन मुलांसमवेत सामान्य जीवन जगत होते. परंतु त्यानंतर काहीसे अजब आणि वेदनादायी अनुभव होऊ लागल्याचे कॅरेन सांगते.
वेदना असह्य
सर्वसाधारणपणे लोक स्वत:ची ऐकण्याची क्षमता गमाविण्याच्या विचारानेच हादरून जातात. परंतु दैनंदिन आवाज कितीही सुखद असला तरीही तो सहन करणे अशक्य असल्यास काय होईल? कॅरेनला 2022 मध्ये हाच अनुभव येऊ लागला, जेव्हा तिचा हायपरएक्यूसिस अचानक सुरू झाला, अचानक आवाज तिच्यासाठी यातनादायी ठरला. स्वकीयांचा आवाज, मित्रांसोबत गप्पा किंवा पसंतीचे संगीत ऐकणेही तिच्यासाठी असह्य डोकेदुखीचे कारण ठरले. यामुळे तिने लोकांपासून स्वत:ला वेगळे ठेवण्यास सुरुवात केली आहे.
डोळ्यांमागे भयंकर वेदना
कुणीतरी माझ्या कानांमध्ये तप्त लाव्हारस ओतल्यासारखे वाटू लागते, माझ्या डोक्यात आग लागल्याचे किंवा माझ्या डोळ्यांमागे आग लागल्याचे वाटू लागते. हा दबाव दूर करण्यासाठी मला माझे डोके खुले करावे असे वाटत असल्याचे कॅरेन सांगते. हायपरएक्यूसिसचे निदान झाल्यापासून ती आता उपचार करवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, किमान याची लक्षणे नियंत्रित करण्याचा तिचा प्रयत्न आहे. परंतु तिच्यासाठी स्थिती आता खडतर होत चालली आहे. ती आता बहुतांश वेळ घरातच घालविते, कारण बाहेरील गोंगाट तिला सहन होत नाही. स्वत:च्या घरातही ती इयरप्लग लावून बसते.