बेनचिनमर्डीतील शेतामध्ये गांजा जप्त
06:22 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
Advertisement
बेनचिनमर्डी, ता. गोकाक येथील एका शेतवडीत पिकवण्यात आलेली गांजाची 13 झाडे जप्त करण्यात आली आहेत. गोकाक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून यासंबंधी एका शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.
आवण्णा सिद्धाप्पा तपशी राहणार बेनचिनमर्डी असे पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतवडीत त्याने गांजा पिकवल्याची माहिती मिळताच गोकाक ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक के. वालीकर, बी. व्ही. निर्ली, सी. जे. सन्नक्की, एम. वाय. पडदल्ली, एन. जी. दुरदुंडी, एच. के. मल्लाडदवर, व्ही. बी. खोत, एच. डी. गौडी आदींनी छापा टाकून गांजाची 13 झाडे जप्त केली आहेत. आवण्णाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement