पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कँडल मार्च
12:32 PM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील ख्रिश्चन समुदायातर्फे शांतता फेरी काढून निषेध नोंदविण्यात आला. कॅम्प येथील मेथोडिस्ट चर्च ते राणी चन्नमा सर्कलपर्यंत ही शांतता फेरी काढण्यात आली. यामध्ये फादर फिलीप कुट्टी, फादर प्रमोद कुमार, फादर जॉनी, रेवरंड चेरियन, अॅड. रमेश मधुराव, चिल्लाळ व अन्य धर्मगुरुंनी सहभाग घेतला. हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व दहशतवादाचा बिमोड करून हल्लेखोराविरुद्ध कठोर पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली. राणी चन्नम्मा सर्कल येथे मेणबत्त्या लावून प्रार्थना म्हणण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
Advertisement
Advertisement