महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रदूषणाविरोधात कुंकळ्ळीवासियांचा मेणबत्ती मोर्चा

11:42 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा पक्षनेत्यांचा इरादा

Advertisement

मडगाव : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या समस्येने आता गंभीर वळण घेतले असून, स्थानिक कुंकळ्ळीकरंनी शनिवार दि. 16 डिसेंबर रोजी मेणबत्ती मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना स्थानिक आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकारने प्रदूषणाची समस्या न सोडविल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार अशी घोषणा केली. कुंकळ्ळी बसस्थानक ते चिफटेन स्मारकापर्यंत काढलेल्या मेणबत्ती मोर्चात शेकडो कुंकळ्ळीवासीय सहभागी झाले होते. कुंकळ्ळी ओद्योगीक वसाहतीतले प्रदूषण थांबवा व आम्हाला मुक्त श्वास घ्यायला द्या अशी मागणी करणारे फलक लोकांनी हातात धरले होते. मोर्चात महिला व ज्येष्ठ नागरीकांची उपस्थिती लक्षवेधक होती. मोर्चात विरोधी पक्ष नेते तथा कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, तृणमुल काँग्रेसचे नेते डॉ. जॉर्सन फर्नांडिस, माजी पोलिस अधिकारी टोनी फर्नांडिस, शुक्ला केणी, यतीन तळावलीकर, इरनीयू कुतिन्हो तसेच इतर नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपण लोकांसोबत असून, कुंकळ्ळीवासीय जे ठरवतात ते मला मान्य आहे असे सांगून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे केवळ खोटी आश्वासने देतात व त्यांना जनतेचे काहीच पडलेले नाही असे आमदार युरी आलेमाव यांनी लोकांना संबोधीत करताना सांगितले.

Advertisement

कुंकळळी पालिकेला कर भरू नका

कुंकळ्ळीची नगरपालिका ही गोव्यातील एकमेव काँग्रेस समर्थक नगरपालिका असतानाही, सदर नगरपालिकेच्या अकार्यक्षमतेची एकप्रकारे कबुली देताना केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी नगरपालिका मंडळ जर प्रदूषणकारी आस्थापने तसेच बेकायदा घरे यावर कारवाई करीत नसेल तर कुंकळ्ळी पालिकेचा कर 1 जानेवारी 2024 पासून देणे लोकांनी बंद करावे असे आवाहन केले. कुंकळ्ळीवासियांनी वीज आणि पाणी बिले भरू नयेत असे ते म्हणाले.

युरी समर्थकांची हुल्लडबाजी

मेणबत्ती मोर्चा जरी कुंकळ्ळी बसस्थानकावऊन सुरू झाला तरी आमदार युरी आलेमाव आपल्या 20-25 समर्थकांसह असोळणा रस्ता जंक्शनवर मोर्चात सहभागी झाले. त्यानंतर चिफटेन स्मारकाजवळ अनेक नागरीकांनी युरी आलेमाव यांच्या भूमिकेवर सरळ प्रŽ विचारल्यानंतर युरी आलेमाव काहीसे गोंधळले. यावेळी युरिंच्या समर्थकांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला व महिलांनाही अपमानास्पद वागणुक दिली. दादागिरी करणाऱ्यात विरोधी पक्षनेत्याचा सरकारी पगार घेत असलेला एक कर्मचारी होता. सदर कर्मचाऱ्याविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी आता कुंकळ्ळीवासियांनी केली आहे. एकंदर प्रकाराचा व्हिडीयो समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. प्रदूषणावर ठोस कारवाई व्हावी यासाठी कुंकळळीतील नागरीकांनी शांतता प्रिय वातावरणात हा मेणबत्ती मोर्चा काढला होता. मात्र, काही जणांनी या ठिकाणी आवाज चढविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार योग्य नव्हता असे मत यतीन तळावलीकर यांनी व्यक्त केले. या ठिकाणी राजकारण आणून आंदोलनात कुणी खो घालण्याचा प्रयत्न करू नये तसेच सरकारी वेतन घेणाऱ्या व्यक्ती आंदोलनात कशा काय सहभागी होऊ शकतात असा सवालही उपस्थित झाल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article