kolhapur : बुधवारच्या चिन्ह वाटपाकडे वडगावातील उमेदवारांचे लक्ष
कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड
खोची : हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी चिन्ह वाटप होणार आहे. या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी तिरंगी तर नगरसेवक पदासाठी काही ठिकाणी तिरंगी व अन्यत्र दुरंगी लढत होणार आहे. यासाठी तिन्ही आघाड्यांकडून एका चिन्हाची मागणी केली आहे.
त्यामुळे बुधवारी होणाऱ्या चिन्ह बाटपात कोणत्या पक्षाला, आघाडीला कोणते चिन्ह मिळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह शहरवासियांना लागली आहे. पेठवडगाव नगर नगराध्यक्षपदासाठी होणार, निवडणूक पालिकेच्या तिरंगी हे तिन्ही निश्चित झाले आहे. उमेदवारांनी अर्जात तीन वेगवेगळ्या चिन्हांची मागणी केली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाने 'नारळाची बाग, शिट्टी, कपबशी या चिन्हाची मागणी केली आहे
तर यादव आघाडीने कपाट,सकल मराठा सेना पक्षाने यादव आघाडी आणि जनसुराज्य, ताराराणी, युवक क्रांती आघाडीने मागितलेली कपाट व नारळाची बाग या दोन्ही चिन्हाची मागणी करुन निवडणुकीत वेगळीच रंगत आणली आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या चिन्ह वाटपात जनसुराज्य शक्ती पक्ष व यादव आघाडीला अपेक्षित चिन्ह मिळणार का? हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे याकडे नजरा लागल्या आहेत.
अपेक्षित चिन्ह मिळण्याची अपेक्षा
कपबशी, स्कूटर चिन्हाची मागणी केली आहे. सकल मराठा पक्षाने कपाट, नारळाची बाग, टेबल चिन्हांची मागणी केली आहे.